सोलापूर : जिल्हा दूध संघाचे निवडणूक बिनविरोध करण्यासाठी ज्येष्ठ आमदार बबनदादा शिंदे, माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी शासकीय विश्रामगृहावर दुपारी दोन वाजल्यापासून बैठक सुरू होती. सुमारे चार तासांहून अधिक असलेल्या बंद दाराच्या आड चर्चेमध्ये दूध संघ बचाव पॅनललाही बोलावण्यात आले होते. या पॅनलचे उपाध्यक्ष भाऊसाहेब धावणे यांच्यासह इतर दोघे पदाधिकाऱ्यांनी नेत्यांशी चर्चा केली चर्चा केल्यानंतर धावणे हे बाहेर आले त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, चर्चा झाली मात्र कोणताही निर्णय नाही दोन दिवसानंतर ते निर्णय घेतील.आजपर्यंत तुम्ही दूध संघ चालवला आता एवढे पाच वर्षे आम्हाला द्या,अशी आमची मागणी असून मान्य न झाल्यास संपूर्ण पॅनल निवडणूक लढवणार अशी भूमिका धावणे यांनी माध्यमांशी बोलताना मांडली.. काय म्हणाले, धावणे पहा…















