सोलापूर/प्रतिनीधी : रस्त्याच्या कडेला बसलेला वयोवृद्ध बसल्याजागी अचानकच पडल्याने त्यांच्या डोक्यास दुखापत झाली. ते पाहून त्यांच्या मदतीस धाऊन गेलेले रूग्णसेवक आनंद गोसकी आणि पुरूषोत्तम वग्गा आणि लोकेश आंबट यांच्या समयसूचकेमुळे त्या ज्येष्ठाला जणू जीवनदान मिळाले. समाजात अजूनही धकाधकीच्या जीवनात माणुसकी जीवंत असल्याचे या घटनेने दाखवून दिलंय.
सोलापुरातील साखर पेठ विणकर बागेच्या समोरील बाजूस एक अनोळखी वयोवृध्द बसल्या जागीच पडल्याने, त्यांच्या डोकीस दुखापत झाल्याचे शुक्रवारी, दि. 17 डिसेंबर रोजी रुग्णसेवक आनंद गोसकी आणि त्यांच्या मित्रानं पाहिलं. ते वेळीच त्यांच्या मदतीस धाऊन गेले. या घटनेत त्यांच्या डोकीस झालेल्या दुखापतीमुळं, त्यानां पिण्यासाठी पाणी देत, डोकीस मलमपट्टी केली.
तो रूग्ण पुन्हा उठून व्यवस्थित घरी जाईल, असे नागरीकांना वाटत होते. रुग्णसेवक आनंद गोसकी यांनी त्यांची ओळख पटविता येणं शक्य होईल, या भावनेनं, त्यांना नाव व पत्ता विचारण्यास प्रयत्न केला ते बोलण्याच्या अवस्थेत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांचे नाव व कुठे राहता, यासाठी गोसकी यांनी बरेच प्रयत्न केले.
अखेरीस रात्री आठ वाजण्याच्या सुमारास, रूग्णसेवक आनंद गोसकी यांनी रूग्णाची परिस्थिती पाहता, थंडीत कुडकुडत चिंताजनक स्थितीत असल्याचे पाहून, त्या रूग्णाला १०८ अॅम्बुलन्सच्या साह्याने सिव्हिल हाॅस्पिटलला घेऊन पोलीस चौकीला माहिती दिली. तात्काळ केस पेपर काढून सिटी स्कॅन व इसीजी वगैरे वैद्यकीय तपासण्या पूर्ण केल्या.
अगदी रुग्णालयात नेण्यापासून दाखल होण्याची प्रक्रिया पूर्ण होण्यापर्यंत रुग्णसेवक गोसकी व्यक्तिशः रात्री साडेअकरा वाजेपर्यंत रुग्णालयात उपस्थित होते. त्या अनामिक रूग्णाच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी
त्यावेळी सेवेवर असलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना हात जोडले.
सिव्हिल हाॅस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी आनंद गोसकी यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. त्या अनोळखी रुग्णाची ओळख पटल्याचं सांगत, त्याचे नातेवाईक तेथे पोहोचल्याचं सांगितले. रुग्णसेवक गोसकी सिव्हिलच्या कर्मचाऱ्यांना त्यांचे नातेवाईक कुठे आहेत, विचारताच समोर उभारलेल्या मुलांकडून आनंदाने ‘हम ही है, भाई ! आप बहुत अच्छा काम किया, आपको बहुत दुवा मिलेगी ‘ या शब्दात त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
त्या नातेवाईकांकडे रुग्णाच्या नावाची चौकशी केली असता, त्यांचं नाव हुसेनसाहब शेख, पाच्छा पेठ, सोलापूर असं असल्याचं स्पष्ट झालं. त्यांच्या प्रकृतीत सिव्हिल हाॅस्पिटलमधून सांगण्यात आले. रस्त्याच्या कडेला पडलेल्या वयोवृध्द जखमीस रुग्णसेवक गोसकी यांच्या प्रयत्नामुळे जीवनदान मिळाले, अशी त्यांच्या आप्तेष्टांची भावना आहे. रस्त्यावरून जाताना, कडेवर ज्येष्ठ दिसले, तर त्यांच्याकडे डोळसपणे पाहिले पाहिजे, हेच गोसकी यांच्या या छोट्याशा प्रयत्नाने दाखवून दिले आहे.

















