सोलापूर : करमाळा तालुक्याच्या नेत्या रश्मी बागल (Rashmi Bagal) या सोमवारी बऱ्याच दिवसांनी जिल्हा परिषदेत आल्या, यावेळी कुणीही पदाधिकारी नसल्याने त्या थेट बांधकाम कार्यकारी अभियंता कटकधोंड यांची भेट घेऊन त्या निघाल्या मात्र वाटेत पत्रकारांनी त्यांना गाठले,बराच वेळ चर्चा केली. यावेळी बोलताना त्यांनी स्वतः राजकीय चिंतन व्यक्त केले,
त्या पुढे म्हणाल्या, तालुक्यात सध्या मकाई साखर कारखाना व्यवस्थित सूरु आहे, मात्र पूर्ण फोकस हा आदिनाथ कारखाना (Adinath sugar) सुरू करण्याकडे आहे, तालुक्यातील ऊस पाहता मकाई कारखान्याची कॅपेसिटी कमी असल्याने एक्स्ट्रा ऊस बाहेर कारखान्याला जात असलेला पहावत नाही. त्यासाठी कारखाना सुरू होणे गरजेचे आहे. राजकारण गेले चुलीत…आदिनाथ साठी कोणतीही तयारी असल्याची भूमिका मांडली.
याचवेळी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे (Laxman Dhobale) हे झेडपीतून बाहेर येताना दिसले, तेव्हा त्या त्यांच्या जवळ गेल्या, त्यांना नमस्कार घेतला आणि त्यांच्या पत्नी निधनामुळे सांत्वन केले. एवढ्यात जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे (Aniruddha Kamble) यांचे झेडपीत आगमन झाले, तेव्हा रश्मी बागल आणि अध्यक्ष कांबळे हे कार्यालयात जाऊन बराच वेळ चर्चा केली,आपल्या तालुक्याच्या नेत्या झेडपीत आणि कार्यालयात आल्याने अध्यक्ष कांबळे यांनी मोठ्या मनाने सत्कार केला.

















