कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात लॅब टेक्निशियन सह कॉम्प्युटर ऑपरेटर, सफाई कामगार अशा जागा कंत्राटी पद्धतीने सप्टेंबर महिन्यात भरण्यात आल्या होत्या, हे टेक्निशियन मेडिकल कॉलेजमध्ये कोरोनाचा आरटीपीसीआर तपासणी करून रिपोर्ट देण्याचे काम करतात, अशा महत्वाच्या कर्मचाऱ्यांना तीन महिनेपासून वेतन दिले गेले नाही त्यांच्या कामाची मुदत 31 डिसेंबर 2020 रोजी संपली आहे दरम्यान सोमवारी मेडिकल कॉलेजमधील अधिष्ठाता कार्यालयात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रदीप ढीले जिल्हा आरोग्य अधिकारी शीतल कुमार जाधव झेडपी चे मुख्य व वित्त लेखा अधिकारी अजय सिंह पवार महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांची बैठक होती ही बैठक तब्बल एक ते दीड तास चालली तेव्हापासून चोवीस कर्मचारी हे जिल्हाधिकारी यांना भेटण्यासाठी थांबले होते बैठक संपली आणि जिल्हाधिकारी तडकाफडकी बाहेर आले पाठीमागून विद्यार्थी ओरडत होते साहेब तुम्हाला बोलायचं थांबा मात्र जिल्हाधिकार्यांनी एकही ऐकले नाही थेट गाडीमध्ये बसून ते निघून गेले दरम्यान या बैठकीमध्ये दिवसाला तीन हजार rt-pcr टेस्ट करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे आणि त्यासाठी हे कर्मचारी महत्त्वपूर्ण आहेत असे असतानाही प्रशासन या कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष करतंय हे निश्चितच योग्य नाही.
सोलापूर पोलिसांनी बिष्णोई गँगमधील दोघांना केली अटक ; प्रकरण आहे तरी काय?
सोलापूर पोलिसांनी बिष्णोई गँगमधील दोघांना केली अटक ; प्रकरण आहे तरी काय? सोलापुरातील स्कॉर्पिओ गाडी चोरी प्रकरणाचे धागेदोरे थेट राजस्थान...