सोलापूर : मार्केट यार्डातील एका भुसार दुकानाच्या छतावरील पत्रा कापून आतील विविध कंपनीचे सुमारे अडीच लाखाचे सिगारेट आणि सात हजार रुपये रोख रक्कम चोरट्याने लांबविले. ही चोरी 18 डिसेंबर मध्ये रात्री बाराच्या नंतर झाली.
याप्रकरणी प्रविण प्रकाश कलकोटे वय ४० वर्षे राहणार इंद्रधनू अपार्टमेंट यांनी फिर्याद दिली आहे कलकोटे यांच्या मालकीचे मार्केट यार्ड मध्ये लक्ष्मीनारायण हे भुसार दुकान आहे. चोरट्याने दुकानाचे पाठीमागील भिंती लगत असलेल्या लिंबाच्या झाडावरून पुढे पत्रावर चढून एक पत्रा कशाने तरी चौकनी आकारात कापला, कापलेल्या पत्र्यातून गोडावून मध्ये उतरून व प्रवेश करून ही चोरी केली. यामध्ये
१) ७,००० त्यात १००,५०,२०१० या दराच्या चलनी नोटा
२) ३०,००० हजाराचे BRISTOL सिगारेटचे एकूण १० पुढे प्रत्येकी एका पुडयात लहान ५० पाकिट असलेले,
३) ९९ ००० हजाराचे KING सिगारेटचे एकूण ३३ मुडे प्रत्येकी एका पुडयात लहान २० पाकिट असलेले.
४) ८४,००० हजाराचे LIGHT सिगारेटचे एकूण २८ पुडे प्रत्येकी पुडयात लहान २० पाकिट
५) ५७,८५० हजाराचे GOLD FLAKE PREM सिगारेटचे एकूण १३ पुढे प्रत्येकी एका पुख्यात
लहान ५० पाकिट असलेले, एकूण २,७७,८५० माल चोरला. या चोरी प्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून महिला पोलीस हवालदार सुरवसे या अधिक तपास करत आहेत.


















