सोलापूर : पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत मंगळवारी शासकीय विश्रामगृहात राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीसाठी माजी शहराध्यक्ष महेश गादेकर हे आले होते. दरम्यान यापूर्वी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक बंद खोली मध्ये सुरू होती. गादेकर यांनी आत जाण्याचा प्रयत्न केला परंतु दरवाजा उघडला नाही. त्यामुळे नाराज झालेले गादेकर शासकीय विश्रामग्रह बाहेर पडले मात्र पालकमंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकांनी त्यांना बैठकीसाठी पुन्हा निमंत्रित करून सभागृहात बसवले.
दरम्यान ही बातमी प्रसारित झाली या बातमी चा खुलासा नंतर शहर कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी केला तसेच उमेश पाटील यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी तर महेश गादेकर यांचे कौतुक करताना गादेकर यांच्या रक्तात शरद पवार आहेत असे सांगून त्यांची नाराजी घालवण्याचा प्रयत्न केला.. नेमके कोण काय म्हणाले पहा हे सर्व व्हिडिओ


















