सोलापूर : पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मंगळवारी सोलापुरात शहर व जिल्ह्याच्या स्वतंत्र बैठका घेतल्या. दुपारी जिल्ह्याची बैठक होती तर सायंकाळी साडेपाच वाजता शहर पदाधिकाऱ्यांची. या बैठकीला आकर्षण असणारे महेश कोठे मात्र उपस्थित नव्हते. पालकमंत्री भरणे मामांनी बैठकीत महेश कोठे यांच्या अनुपस्थिती बाबत बोलताना स्पष्टीकरण दिले, महेश अण्णा मुंबईला गेलेत परंतु त्यांनी फोन केला होता ते टेम्भुर्णीला आहेत. येतो म्हणाले पण लवकर येतील हे वाटत नाही असे म्हणतात केवळ पाच मिनिटात महेश कोठे दिलीप कोल्हे यांच्या सोबत डाक बंगल्यात आले, आता खुर्ची कोण देणार हा विषय होता, चंदनशिवे यांना ही मोठी खुर्ची मिळाली होती, ते ही उशिरा आले होते, अनेकांना वाटले कोठे हे चंदनशिवे यांच्या जवळ गेल्याने ते उठून खुर्ची देतील परंतु, ते उठले नाहीत, शेवटी युवक प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर यांनी उठून खुर्ची दिली. कोठे बसताच पालकमंत्र्यांनी पुन्हा कोठे यांच्या बद्दल बोलताना अण्णा आम्हाला तुम्ही याल असे वाटत नव्हते पण तुम्ही लवकर आलात, राव तुमची गाडी लय जोरात आहे, आपली महापालिका पण आता जोरात येणार असे म्हणतात उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली लगेच मामांनी आपला मोर्चा मनोहर सपाटे यांच्याकडे वळवला, सपाटे साहेब तुम्हीपण ग्रेट आहेत, तुम्हाला पाहिलं की काही तरी वेगळं जोरात वाटतं असे पालकमंत्री म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला आणि सपाटे यांनी पालकमंत्र्यांना हात जोडले…..नक्की पहा व्हिडीओ

















