सोलापूर : सोलापूर महापालिकेच्या वतीने शहरातील सात रस्ता येथील महापालिका परिवहन उपक्रम बस डेपो येथे आणि हैदराबाद रोड जकात नाका येथील महापालिकेच्या जागेवर दोन पेट्रोल पंप इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) यांच्या साह्याने सुरू करण्यात येत आहे. त्यासंदर्भात बैठक घेण्यात आली.
सोलापूर शहरात महापालिकेच्यावतीने हैद्राबाद रोड जकात नाका व सात रस्ता येथील बसडेपो येथे पेट्रोल पंप, डिझेल पंप, इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन आणि सीएनजी पंप एकत्रीतपणे सुरु करण्यात येणार आहे. एक मॉडेल पेट्रोल पंप म्हणून महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात येणार आहे. दोन्ही ठिकाणीचे पेट्रोल पंपा साठी आवश्यक असणाऱ्या परवानग्या मिळविण्याचे काम सुरु आहे.
हैद्राबाद रोडवरील जागेवर पेट्रोल पंप उभारण्यासाठी तेथील जागेच्या स्वच्छतेचे काम हाती घेण्यात येणार आहे.तसेच पेट्रोल पंपासाठी लागणाऱ्या परवानग्या लवकरात लवकर घेण्यासंदर्भात महापालिकेच्या अधिकारी व इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आले आहेत अशी माहिती महापालिकेचे आयुक्त शीतल तेली -उगले यांनी दिली.

















