शुक्रवारी झालेल्या सोलापूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी अतिक्रमण विभागाकडून झालेल्या कारवाईचा निषेध व्यक्त केल्यानंतर महापौरांनी सभागृहाची बाजू पाहून लवकरात लवकर सर्वसामान्यांना न्याय देणारा निर्णय घेतला जाईल असं रोलिंग देताच प्रभागाचे नगरसेवक सुरेश पाटील महापौरांच्या विरोधात घोषणाबाजी करत हातातील माईक भर सभेत पुन्हा फेकून देण्याचा प्रकार केला महापौरांच्या डाय समोर जाऊन उद्धटपणे महापौरांची वाद घालण्याचा प्रयत्न तेव्हा महापौरांनी देखील सुरेश पाटलांना आपण उर्मटपणे माझ्याशी वाद घालू नका तुम्ही माझ्याशी व्यवस्थित बोला असं बोलण्याचा प्रयत्न केला पण सुरेश पाटील हे ऐकण्याच्या पलीकडे गेले होते ,
सुरेश पाटील हे महापौरांचा अपमान करीत आहेत हा सोलापूरकरांचा अपमान आहे सुरेश पाटलांना त्वरित निलंबित करा अशी मागणी होताच महापौरांनी डायस वरून सुरेश पाटील यांना एक दिवसासाठी निलंबित करत असल्याची घोषणा केली.
सुरेश पाटलांच्या किरकिरी मुळे वैतागलेल्या माजी सभागृह नेते श्रीनिवास करली यांना तर इतका आनंद झाला की त्यांनी थेट पेढे मागवून नगरसेवकांना भरवले, पहा हा व्हिडिओ