सोलापूर : अक्कलकोट तालुक्याचे वादग्रस्त प्रभारी गटशिक्षणाधिकारी अशोक भांजे यांच्यामुळेच सोलापूर जिल्हा परिषदेत झाले अनेकांचे वांदे या विषयावर ‘सिंहासन’ न्यूजने वृत्त मालिका लावली होती. यामध्ये भांजे यांचे अनेक कारनामे बाहेर आले. एकाच माणसाकडे अनेक पदे असल्याने निश्चित भ्रष्टाचाराला वाव आल्याचे निदर्शनास आले. तीन पदभार आणि स्वतःच्या शिक्षण संस्था यामुळे असे अधिकारी शिक्षण विभाग सुधारण्याकडे कसे लक्ष देणार हे सुद्धा या वृत्त मालिकेतून उजेडात आले.
भांजे हे जातीय द्वेषातून निलंबित मुख्याध्यापक महानतेश्वर कट्टीमनी यांना त्रास देत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. तसेच अक्कलकोट पंचायत समितीच्या मासिक सभेमध्ये भांजे यांच्या कारभारावर सभापती सोनकांबळे यांनी नाराजी व्यक्त केली होती. या वृत्त मालिकेनंतर मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे सुद्धा अशोक भांजे यांच्या भानगडीवर नाराज होते.
भांजे यांच्या कडून अखेर अक्कलकोट गटशिक्षणाधिकारी पदाचा पदभार काढण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून मिळत आहे, गटशिक्षणाधिकारी पदाचा पदभार आता प्रमोशन झालेल्या खुदशिया शेख यांच्याकडे सोपविण्यात येणार असल्याची माहिती मिळाली. त्याच बरोबर वर्षानुवर्षे माध्यमिक शिक्षण विभागात विस्तार अधिकारी पदावर कार्यरत असल्याने तिथला ही पदभार काढण्यासाठी शिक्षणाधिकारी बाबर हे प्रयत्न करत असल्याची खात्रीशीर माहिती आहे.


















