सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेमधील बांधकाम विभाग तसेच जलसंधारण विभागांमधील ऑफिस इन्चार्ज अर्थात कनिष्ठ प्रशासन अधिकारी यांचा कार्यालयात ठावठिकाणा नसल्याने या दोन्ही विभागाला कायम डोकेदुखी झाल्याची चर्चा झेडपी आवारात ऐकण्यास मिळते. आता तर कार्यालयात ओएस दाखवा आणि एक हजार रुपये बक्षीस मिळवा अशी मजेदार चर्चा सुरू झाली आहे.
जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्रमांक एक हे कार्यालय तिसऱ्या मजल्यावर आहे या ठिकाणी ऑफिस इन चार्ज म्हणून नितीन जाधव आहेत मात्र कार्यालयात कमी आणि बाहेर पोर्चमध्ये जास्त वावर त्यांचा दिसून येतो त्यांच्या कामकाजाला स्वतः कार्यकारी अभियंता यांच्यासह इतर अधिकारी ही वैतागल्याचे बोलले जात आहे. अनेक वेळा समजावून सांगूनही त्यांच्या कार्यपद्धतीत सुधारणा होत नसल्याची चर्चा आहे. काही वेळ कार्यालयात बसायचे आणि बाहेर पोर्चमध्ये कॅन्टीनमध्ये त्यांचा वावर पाहायला मिळतो.
बांधकाम विभागाप्रमाणे त्याच तिसऱ्या मजल्यावर खूप समोर असलेल्या लघु पाटबंधारे विभागातील कनिष्ठ प्रशासनाधिकारी कुमारगौरव शिंदे हे तर कार्यालयात कधीच नसतात .प्रभारी कार्यकारी अभियंता पंडित भोसले हे जिल्ह्यातील व्हिजिटवर गेल्याचा फायदा शिंदे घेतात जर ऑफिसला आलेच तर पाच मिनिटे कार्यालयात बसून त्यांचा जास्तीत जास्त वावर हा बाहेर कॅन्टीन आणि पोर्च परिसरात जास्त पाहायला मिळतो.
कुमारगौरव शिंदे यांच्यासोबतच याच कार्यालयातील कनिष्ठ सहाय्यक विजयकुमार रणदिवे हा कर्मचारी चमत्कारिक पद्धतीने असतो, कधी ही येणे, जाणे असे काम असते, पंढरपूर वरून लघुपाटबंधारे येथे नियुक्ती झाली, धड इथे ही काम व्यवस्थित नसताना आता माध्यमिक शिक्षण विभागात एक्स्ट्रा काम देण्यात आले आहे, त्यांच्यावर एवढी मेहेरबानी का? असा सवाल ही कर्मचाऱ्यांनी मधून उपस्थित केला जात आहे. अशा कामचुकार कर्मचाऱ्यांवर प्रशासन कारवाईचा बडगा कधी उगरणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय.


















