सोलापूर : दुय्यय निबंधक कार्यालयात बनावट मृत्युपत्र तयार करून संगनमताने 2 कोटी 10 लाख 68 हजार रुपये आपल्या खात्यात वर्ग करणाऱ्या 7 जणांविरुद्ध सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंद्रशेखर महादेव बागदुरे, वय ५१ वर्षे, रा. नरेंद्र नगर, सैफुल विजापूर रोड,यांनी याप्रकरणी फिर्याद दिली असून १) राजशेखर महादेव बागदुरे, २) राजश्री राजशेखर बागदुरे, ३) राकेश ऊर्फ सिध्देश्वर राजशेखर बागदुरे, सर्व रा. अक्षय सोसायटी, जुळे सोलापूर, विजापूर रोड, सोलापूर, ४) शारदा विजयकुमार बागदुरे रा. शिवगंगा नगर, शेळगी सोलापूर ५) दिपक राजेंद्र माशाळ, रा. ४७७, न्यु पाच्छा पेठ, सोलापूर, ६) जगदिश सुधाकर जाधव, रा. मसरे गल्ली, महालक्ष्मी दुध डेअरी शेजारी,यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
यात हकिकत अशी, दुय्यम निबंधक कार्यालय (वर्ग-२), याठिकाणी आरोपीनी मिळुन संगनमत करून दि. २४/१२/२०१८ रोजी पासुन ते आजपर्यंत फिर्यादीच्या वडीलाचे बनावट मृत्युपत्र तयार करुन उमासा नागरी सहकारी पतसस्था रविवार पेठ, सोलापूर येथील खाते क्र. ७९३ मध्ये वडीलाचे नावे जमा असलेली रक्कम २ कोटी १० लाख ६८ हजार रु आरोपीतानी त्याचे खात्यामध्ये वर्ग करुन घेवून फिर्यादीची व फिर्यादीच्या आईची फसवणुक केली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक धायतोंडे हे तपास करत आहेत.

















