सोलापूर- मोक्का अंतर्गत अटक असलेल्या आरोपीचं कोरोना पॉजीटिव्ह रिपोर्ट आल्याने त्यावर उपचार सुरू होते.त्याने याचाच फायदा घेऊन पोलिसांच्या हातावर तुरी देऊन मोक्का अंतर्गत अटक असलेल्या आरोपीने हातातील बेड्या काढून पलायन केले.फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या 6 जणांच्या डीबी पथकाने ताबडतोब तपासाची सूत्रे फिरवून त्याला मोदी येथील रेल्वे वसाहती मधून अटक केली आहे.संतोष संजय कांबळे(वय 29,रा,जय मल्हार चौक,आडवा नळ,सोलापूर शहर) असे आरोपीचे नाव आहे.
सोलापूर शहर पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली होती.संतोष कांबळे देखील मोक्का अंतर्गत अटक होता.फौजदार चावडी पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केले करून न्यायालयीन कोठडीत त्याची रवानगी करण्यात आली होती.त्याचा आरटीपीसीआर रिपोर्ट पॉजीटीव्ह आला होता.त्यामुळे पोलिसांनी त्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू केले होते. उपचार झाल्या नंतर त्याला शासकीय तंत्रनिकेतन येथे क्वारंटाईन करण्यात आले होते.येथे उपचार घेत असताना ,त्याने हातातील बेड्या अलगद काढल्या आणि पलायन केले.यामुळे पोलीस प्रशासन हादरले होते. फौजदार चावडी पोलिसांच्या डीबी पथकाने ताबडतोब तपासाची चक्रे फिरवली आणि एका खबऱ्या मार्फत त्याचा ठावठिकाण लावला.संतोष कांबळे हा मोदी खाना येथील असलेल्या रेल्वे वसाहतीमध्ये बंद घरात लपून बसला होता.
मंगळवारी पहाटेच्या सुमारास त्याला सापळा लावून मुसक्या आवळल्या.पुन्हा त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन कारवाई सुरू केली आहे.ही कामगिरी फौजदार चावडी पोलीस ठाण्यातील डीबी पथकातील पीएसआय सोमनाथ देशमाने आणि त्यांच्या टीमने केली आहे


















