सोलापूर दि.5(जिमाका): जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पोर्टलवरील नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांची e KYC करण्यासाठी जिल्ह्यामध्ये विशेष जनजागृती मोहिम राबवून दि. 31 मार्च 2022 अखेर पर्यंत जिल्ह्यातील सर्व तहसिलदार तथा पी.एम.किसान योजनेचे तालुकास्तरीय नोडल अधिकारी यांनी e KYC पूर्ण करुन घ्यावेत, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी तथा पी.एम.किसानचे जिल्हस्तरीय नोडल अधिकारी शमा पवार यांनी दिले आहे.
जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना खालीलप्रमाणे e -KYC करण्यासाठी OTP किंवा बायोमॅट्रीक हे पर्याय पोर्टलवर उपलब्ध करुन दिलेले आहेत.
1)पी.एम.किसान योजना https:/pmkisan.gov.in या वेबसाईटवरील Farmer Crner या टॅब मध्ये किंवा पी.एम.किसान ॲपद्वारे लाभार्थ्यांना स्वत: e –KYC प्रमाणिकरण मोफत करता येईल.
2)ग्राहक सेवा केंद्र (CSC) केंद्रावर e KYC प्रमाणिकरण बायोमॅट्रीक पध्दतीने करता येईल.
3) केंद्र शासनाकडून ग्राहक सेवा केंद्र (CSC) केंद्रावर बायोमॅट्रीक पध्दतीने e-KYC प्रमाणिकरण करण्यासाठी प्रति लाभार्थी प्रति बायोमॅट्रीक प्रमाणिकरण दर रु. 15 जुलै 2022 या कालावधीचा लाभ प्राप्त होण्यापूर्वी e-KYC प्रमाणिकरणाची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे. तरी जिल्ह्यातील सर्व तहसिलदार तथा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे तालुकास्तरीय नोडल अधिकारी यांनी आपल्या तालुक्यातील प्रत्येक पात्र शेतकऱ्यांचे e-KYC करण्यासाठी प्रबोधन करावे, असे आवाहन श्रीमती पवार यांनी केले.

















