सोलापूर : आपल्या नवीन बंगल्याच्या वैभवाआड झाड येत असल्याने त्या हेरिटेज झाडाची बेकायदेशीर कत्तल केल्याचा प्रकार सोलापुरात समोर आला आहे. विशेष म्हणजे हा बंगला एका राजकीय पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याचा असल्याची माहिती आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी अद्यापही कारवाई केली नसल्याची माहिती सूत्रांकडून समजली.
अक्कलकोट रोडवर वालचंद महाविद्यालयाकडे जाणारा रस्ता आहे, या रोडवर पद्म नगर ही मोठी कॉलनी आहे. याठिकाणी एका राजकिय नेत्याने मोठा बंगला बांधला आहे, मात्र या परिसरात मोठं मोठी जुनी हेरिटेज दर्जाची झाडं आहेत. आपल्या बंगल्याचे वैभव या झाडांमुळे झाकलं गेले असल्याचे लक्षात आल्यावर मोठे पिंपळाच्या झाडाची कत्तल यावेळी करण्यात आली.
एका पत्रकाराने व्हिडीओ काढताना झाड तोडणे थांबवल्याचे समजले. त्या पत्रकाराने महानगरपालिकेच्या उद्यान विभागाकडे चौकशी केली असता झाडे तोडण्याची कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे समोर आले आहे. त्या नेत्याच्या भीतीने कारवाई कुणी केलीच नाही उलट कुणी तक्रार देतंय का याची वाट पालिका कर्मचारी पहात असल्याची माहिती मिळाली.


















