सोलापूर : सोलापूर आणि अहमदनगर वगळता राज्यातील सात मतदारसंघात सहा जागेसाठी विधानपरिषदेची निवडणूक मंगळवारी जाहीर झाली यामध्ये सोलापूरचा समावेश नसल्याने सुमारे सव्वा चारशे नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्य तसेच पंचायत समिती सभापतींच्या स्वप्नावर पाणी फिरले आता हे सर्व मतदार केवळ रडायचच 😥😥😥 बाकी राहील्याची मजेदार चर्चा ऐकण्यास मिळत आहे.
राज्यातील विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी डिसेंबरमध्ये निवडणूक होणार आहे.. अहमदनगर आणि सोलापूर वगळता इतर ५ मतदारसंघात ६ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. मात्र सोलापूर विधान परिषदेची निवडणूक वगळण्यात आली आहे.
विधान परिषद मतदार संघातील एकूण मतदारांपैकी किमान 75 टक्के मतदार पात्र असणे आवश्यक आहे. मात्र सोलापूरमध्ये नव्याने नगरपालिका आणि नगरपंचायतीची स्थापना झाली आहे. एकूण मतदारांपैकी 75 टक्के मतदार पात्र नसल्याचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाने दिल्याने सोलापूर विधानपरिषदेची निवडणूक लांबणीवर गेल्याची माहिती देण्यात आली.
राज्यातील अन्य जागेच्या विधान परिषदेच्या निवडणूकीसाठी १० डिसेंबरला मतदान होणार आहे. याची अधिसूचना १६ नोव्हेंबरला काढण्यात येणार आहे. तर अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २३ नोव्हेंबर २०२१ असणार आहे. तर २६ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येतील. १० डिसेंबरला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर या निवडणुकीची मतमोजणी १४ डिसेंबरला होणार आहे. 16 डिसेंबरपर्यंत निवडणूक घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सोलापूर विधान परिषद निवडणुकीची मतदार संख्या 75 टक्क्यांच्या आत असल्याचे कारण पुढे करत ही निवडणूक घेता येणार नसल्याचे निवडणूक आयोगाच्या सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. येत्या दोन महिन्यांमध्ये सोलापूर महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगर पालिका, आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका असल्याने विधान परिषदेच्या निवडणुकीवर सर्वांचा डोळा होता.
ही निवडणूक म्हणजे सोन्याचे अंडे देणारी कोंबडी म्हणून प्रसिद्ध असल्याने या निवडणुकीतून आलेल्या पैशावर आगामी जिल्हा परिषद आणि महापालिका तसेच नगरपालिका निवडणूक लढवण्याचे नियोजन सर्वच नगरसेवक झेडपी सदस्यांनी केले होते मात्र ही निवडणूक रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आल्याने अनेकांच्या आशेवर पाणी फेरले, स्वप्नांचा चुराडा झाला, केवळ या सर्वांच्या डोळ्यातून पाणी येणे बाकी होते असे चित्र सध्या दिसत आहे.

















