सोलापूर : सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक 15 डिसेंबर 2021 च्या आदेशानुसार ना.मा.प्र.करिता आरक्षित असलेल्या जागा अनाक्षित करण्यात आलेल्या असून अशा एकूण 106 नगरपंचायतीच्या सोबतच्या परिशिष्ट-3 मधील नमूद सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुका-2021-22, कार्यक्रम जाहीर करण्यात आल्याची माहिती राज्य निवडणुक आयोगाचे सचिव किरण कुरूंदकर यांनी दिली आहे. त्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, म्हाळुंग-श्रीपूर,वैराग व नातेपुते या नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम होणार आहे.
कार्यक्रम
1.जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक कार्यक्रम जारी करण्याची तारीख-28 डिसेंबर 2021 मंगळवार
2.नामनिर्देशनपत्र राज्य निवडणुक आयोगाने निश्र्चित केलेल्या वेबसाइटवर भरण्याकरीता उपलब्ध करण्याचा कालावधी-29 डिसेंबर 2021 बुधवार सकाळी 11 ते 3 जानेवारी सोमवार दुपारी 2.00 पर्यंत
3.वरील नामनिर्देशनपत्रे स्विकरण्याचा कालावधी-29 डिसेंबर 2021 बुधवार ते 3 जानेवारी 2022 सोमवार सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 पर्यंत, दिनांक 1 जानेवारी 2022 शनिवार व दिनांक 2 जानेवारी 2022 रविवार या सुट्टींच्या दिवशी नामनिर्देशनपत्र स्विकारण्यात येणार नाहीत.
4.नामनिर्देशनपत्राची छाननी व वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करयाचा दिनांक – 4 जानेवारी 2022 मंगळवार सकाळी 11.00 वाजल्यापासुन
5.नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम दिनांक अपील नसेल तेथे-10 जानेवारी 2022 सोमवार दुपारी 03.00 वाजेपर्यंत
5-अ- अपील असल्यास-1) वैधरित्य नामनिर्देशित केलेल्या उमेदवारींची यादी प्रसिध्द झाल्याच्या तारखेपासून तीन दिवसाच्या आत,जिल्हा न्यायाधिशाकडे अपिल करता येईल.2)निवडणुक निर्णय अधिकारी यानी अपिलाचा निर्णय लवकरात लवकर प्राप्त करुन घेण्यासाठी प्रयत्न करावेत-अपिलाचा निर्णय ज्या तारखेस करण्यात येईल त्या तारखेनंतर तिसऱ्या दिवशी किंवा तत्पूर्वी
6.निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक-उमेदवारी मागे घेण्यासाठीच्य शेवटच्या दिवसानंतरच्या लगतच्या दिवशी
7.आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक-18 जानेवारी 2022 मंगळवार सकाळी 7.30 पासून ते सायंकाळी 5.30 पर्यंत
8.मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दिनांक-19 जानेवारी 2022 बुधवार सकाळी 10.00 वाजल्यापासून
9.महाराष्ट्र शासन राजपत्रात निकाल प्रसिध्द करणे-कलम 19 मधील तरतुदीनुसार
★ सुधारित फेर सोडतिचा कार्यक्रम असा असेल
माहे एप्रिल-2020 ते मे,2021 या कालावधीत मुदत समाप्त झालेल्या एकूण 82 नगरपंचायती आणि माहे डिसेंबर 2021 मध्ये मुदत समाप्त होणाऱ्या 18 आणि 6 नवनिर्मित अशा एकूण 106 नगरपंचायतींच्या मा.सर्वोच्च न्यायालयाच्या दिनां 15 डिसेंबर 2021 च्या आदेशानुसार ना.मा.प्र. करिता आरक्षित असलेल्या ज्या जागा सर्वसाधारण प्रवर्गाच्या होतील, त्या जागांपैकी सर्वसाधारण महिलांकरिता आरक्षित ठेवावयाच्या जागांसाठी सुधारित फेर सोडतीचा कार्यक्रम-2021 जाहीर केला असुन तो पुढीलप्रमाणे असल्याची माहिती राज्य निवडणुक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी दिली आहे.
1.सदस्य पदांच्या ना.मा.प्र.व ना.मा.प्र.महिला आरक्षणाऐवजी सर्वसाधारण/सर्वसाधारण महिला प्रवर्गातील महिलांकरिता आरक्षित करण्यासाठी नोटीस प्रसिध्द करणे (जिल्हाधिकारी नगरपंचायतीच्या वेबसाईटसह) – जिल्हाधिकारी- सोमवार 20 डिसेबंर 2021
2.नगरपंचातीच्या सदस्य पदांच्या ना.मा.प्र.व ना.मा.प्र.महिला आरक्षणाऐवजी सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांची सोडत काढणे. (मा. सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक 15 डिसेंबर 2021 च्या आदेशानुसार)- मुख्याधिकारी- गुरुवार 23 डिसेंबर 2021
3.आरक्षण व सोडतीचा अहवाल संबंधित विभागीय आयुक्त तथा प्रोदशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन, यांचेकडे पाठविणे.- जिल्हाधिकारी-24 डिसेंबर 2021 (शुक्रवार)पर्यंत
4.नगरपंचायतीच्या सदस्य पदांच्या ना.मा.प्र.व ना.मा.प्र.महिला आरक्षणा ऐवजी सर्वसाधारण/ सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांच्या अतिंम आरक्षणास मान्यता देणे.-संबंधित विभागीय आयुक्त-27 डिसेंबर 2021 सोमवार पर्यत
5.अधिनियमातील कलम 10 नुसार अंतिम अधिसूचना वृत्तपत्रात व स्थानिक पातळीवर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व नगरपंचातींच्या वेबसाईटवर प्रसिध्द करणे.- जिल्हाधिकारी-28 डिसेंबर 2021
सोडत काढण्यात येणाऱ्या नगरपंचातीच्या आरक्षण व सोडत इत्यादी ते अंतिम अधिसुचना प्रसिध्द करण्यापर्यंतच्या कामावर नियंत्रण ठेवण्याकरीता जिल्हाधिकारी यांनी उपजिल्हाधिकारीपेक्षा कमी नसलेल्या दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणुक करावी, असे ही नमुद करण्यात आलेले आहे.

















