सोलापूर : दि. १५ जानेवारी रोजी कुलगुरू मृणालिनी फडणवीस व प्रसिद्ध उद्योजक एम. केशव रेड्डी यांच्या उपस्थितीत छोटेखानी समारंभात सुवर्णपदक प्रदान सोहळा पार पडला. दरवर्षी हे सुवर्ण पदक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर येथील भाषा संकुल व विद्यापीठाशी संलग्न असणार्या ११८ महाविद्यालयातून मराठी, हिंदी, इंग्रजी, कन्नड, उर्दू, संस्कृत, पाली या सर्व विषयांमधून एम. ए. ला प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला बी. के. रवी गुरुजी सुवर्ण पदक हे सुवर्णपदक दिले जाते.
२०२१ सालचे हे पदक डॉ औदुंबर मस्के यांनी पटकावले. डॉक्टर मस्के यांना सन २०२१ या वर्षी पाली भाषेतून एम. ए. पुर्ण करून उपरोक्त सर्व भाषांमधून प्रथम आल्याने हे सुवर्णपदक प्राप्त झाले. मस्के यांनी पाली भाषेचे जनक तथागत भगवान बुद्ध, महामानव बाबासाहेब डॉ आंबेडकर,व बहीण साधना मस्के यांच्या चरणी हे सुवर्णपदक अर्पण केले आहे.


















