Thursday, March 5, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर झेडपी राज्यात ‘लयभारी’ ; ग्रामीण भागात 100 टक्के नळ जोडणी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
28 March 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर जिल्हा परिषदेस 2020-21 करिता 181274 एवढे उद्दिष्ट 31 मार्च 2021 अखेर पूर्ण करावयाचे होते. परंतु मार्च 2020 ते सप्टेंबर 2020 या कालावधीत कोरोना काळात कडक लॉकडाऊन, कार्यालयात कर्मचाऱ्यांची मर्यादित उपस्थिती, गाव पातळीवर लॉकडाऊनमुळे कामातील येणाऱ्या अडचणी त्याचप्रमाणे ग्रामसेवक व इतर अधिकारी कर्मचारी मुख्यत्वे कोरोना संबंधित कामकाजामध्ये व्यस्त असल्यामुळे वरील कालावधीत प्रत्येक घरी नळजोडणी कार्यक्रमामध्ये अडचणी निर्माण होऊन कामे झाली नव्हती. या कालावधीत फक्त दहा हजार नळजोडणीचे काम पूर्ण झाले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी नोव्हेंबर 2020 मध्ये पदभार घेतल्यापासून या कार्यक्रमास खऱ्या अर्थाने गती प्राप्त झाली. स्वामी यांनी विभागीय स्तरावर, मुख्यालय स्तरावर व तालुकास्तरावर ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, शाखा अभियंता, उप अभियंता, गटविकास अधिकारी यांच्या वेळोवेळी बैठका व सर्वसमावेशक कार्यशाळा, त्याचप्रमाणे दररोज व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून व प्रत्येकाशी फोन द्वारे संवाद साधून या कामाचा पाठपुरावा सुरू ठेवला. आणि आज या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे वर्षभराचे काम नोव्हेंबर ते मार्च या चार महिन्यात पूर्ण करण्यात यश प्राप्त झाले आहे. या यशामध्ये जिल्हा परिषदेच्या यंत्रणेतील अनेक अधिकारी व कर्मचारी यांचा महत्त्वाचा वाटा आहे. यामध्ये प्रामुख्याने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अर्जुन गुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गोरख शेलार, सर्व गट विकास अधिकारी, उप अभियंता,शाखा अभियंता, विस्तार अधिकारी पंचायत, ग्रामसेवक व अनेक नळजोडणी कारागीर यांच्या उत्कृष्ट टिमवर्कमुळे अवघड वाटणारे काम लीलया पूर्ण झाले आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी सीईओ यांनी कार्यपूर्ती पंधरवडाचे आयोजन केले होते. यामध्ये 5 मापदंड देण्यात आलेले होते.

1) अनधिकृत नळ कनेक्शन अधिकृत करणे.

2) गावांतर्गत उपलब्ध नमुना नंबर 9 व 24 नोंदवह्या  IMIS पोर्टलवर अद्ययावत करणे.

3) पंतप्रधान आवास योजना/शबरी/पारधी आवास इ. योजनेतील घरकुलांना प्राधान्याने नळजोडणी देणे.

4) गावातील स्टँड पोस्ट कमी करून वैयक्तिक नळजोडणी वर भर देणे.

5) केलेल्या कामास फोटो व व्हिडिओ द्वारे व्यापक प्रसिद्धी देणे.

3 August 2020 च्या शासन निर्णयानुसार पंधराव्या वित्त आयोगातील पन्नास टक्के निधी केवळ नळ जोडणीसाठीच वापरण्यात येणार असल्याने भविष्यात प्रत्येकाला नळाद्वारे शुद्ध पाणीपुरवठा होणार आहे.

फक्त चार महिन्यात वर्षाची उद्दिष्टपूर्ती करण्याचे  अद्वितीय काम दिलीप स्वामी यांच्या कुशल नेतृत्वामुळे पार पडले. ” जिथे इच्छा तिथे मार्ग ” : आर.विमला मिशन डायरेक्टर महाराष्ट्र राज्य.

आतापर्यंतच्या सेवेमध्ये अनेक कामे वेळेत पूर्ण केली आहेत. उद्दिष्ट मिळत असते ते आपल्याकडून पूर्ण होत ही असते परंतु सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार घेतल्यापासून चार महिन्यात जिल्ह्यातील अनेक घरांना शुद्ध व पुरेसा पाणीपुरवठा करण्याचे काम उद्दिष्टाच्या पुढे जाऊन कमी कालावधीत पूर्ण केले याचा मनस्वी आनंद होत आहे. या कार्यपूर्ती मध्ये यंत्रणेतील सहभागी सर्व टीमचे मनापासून अभिनंदन करीत आहे. : दिलीप स्वामी

कोरोना कालावधीत जे काम पूर्ण होणे अशक्य वाटत असताना मा. स्वामी साहेबांच्या रूपाने एक संजीवनी आम्हाला प्राप्त झाली तिच्या उर्जेने आम्ही झपाटून कामाला लागलो आणि आज अशक्य वाटणारे काम पूर्ण करू शकलो : सुनील कटकधोंड


SendShareTweetSend
Previous Post

काँग्रेस पक्षात कार्याध्यक्ष पदाचा भरणा ; मनोज यलगुलवार झाले तिसरे शहर कार्याध्यक्ष

Next Post

‘लॉकडाऊन’ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झाले गंभीर, लॉकडाऊनच्या दृष्टीने प्रशासनाने नियोजन करण्याचे आदेश

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

'लॉकडाऊन' मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झाले गंभीर, लॉकडाऊनच्या दृष्टीने प्रशासनाने नियोजन करण्याचे आदेश

ताज्या बातम्या

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026
अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

22 January 2026
ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती  ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

20 January 2026
दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

19 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1970996
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group