महाराष्ट्र राज्य जिप आरोग्य कर्मचारी संघटना यांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामींना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष वाय पी कांबळे, राज्य उपाध्यक्ष संजय उपरे, जिल्हा सरचिटणीस समीर शेख, विभागीय अध्यक्ष विजया राऊत, जिल्हा उपाध्यक्ष कृष्ण घंटे, महिला अध्यक्षा रोहिणी सुगंधी, जिल्हा कार्याध्यक्ष संतोष मंडलिक, डांगे, गरड, नयना शिंदे, काशिनाथ गाडे व संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हा परिषदेतील सर्व संवर्गीय आरोग्य कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या पदोन्नती समुपदेशनाद्वारे करण्यात याव्या, नयना शिंदे यांच्यावर झालेले अन्यायकारक निलंबन त्वरित रद्द करण्यात यावे, जिप आरोग्य कर्मचारी हे कोवीड काळात एकही सुट्टी न घेता अविरतपणे देशावर आलेले संकट दूर करण्याचा प्रयत्न करत असून त्यांचे वेतन हे एक तारखेलाच व्हावे, या संघटनेच्या मागण्या आहेत. दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ते मान्य केले असून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन येत्या 24 जानेवारी रोजी बैठक लावून प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकारी व सामान्य प्रशासन विभागाला दिले.


















