सोलापूर : जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषदेत सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशादीन शेळकंदे यांनी कोहिनकराना शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर जिल्हा परिषदेमध्ये बांधकाम विभाग, सामान्य प्रशासन विभाग, अर्थ विभाग, पशुसंवर्धन विभाग, कृषी विभाग, शिक्षण विभाग, जलसंधारण विभाग, ग्रामपंचायत विभाग, आरोग्य विभाग, पाणीपुरवठा विभाग, महिला व बालकल्याण विभाग, समाज कल्याण विभाग यांच्यावतीने कर्मचाऱ्यांनी भेटून शुभेच्छा दिल्या.
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष काका साठे, दक्षिण भाजपचे हनुमंत कुलकर्णी, यतीन शहा, माऊली पवार, काँग्रेस सरचिटणीस श्रीशैल रणधीरे यांनी शुभेच्छा दिल्या.
मुख्य वित्त व लेखा अधिकारी उत्तम सुर्वे, समाज कल्याण अधिकारी सुनील खमीतकर, कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, लेखाधिकारी रफिक मुल्ला, शिक्षणाधिकारी सुलभा वटारे, कृषी अधिकारी परमेश्वर वाघमोडे यांनीही भेटून शुभेच्छा दिल्या. आमदार संजयमामा शिंदे यांचे स्वीय सहायक संजय आंबोले यांनी वाढदिनी सत्कार केला. आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे स्विय सहाय्यक आसिफ शेख यांनी ही शुभेच्छा दिल्या.
जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने अध्यक्ष विवेक लिंगराज यांनी जिल्हा परिषदेच्या परिसरात कोहिनकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण जतनाचा संदेश दिला.


































