सोलापूर – जिल्हा परिषद हे कुटूंब आहे. सहकारी यांचे शी कुटूंबातील सहकारी यांचे प्रमाणे वागा. लोकांना चांगल्या सेवा द्या असे आवाहन सिईओ दिलीप स्वामी यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात नुतन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांचे स्वागत व चंचल पाटील यांची प्रकल्प संचालक ग्रामीण विकास यंत्रणा सातारा येथे बदली झाले निमित्त त्यांना निरोप देणेत आला. तसेच कार्यकारी अभियंता खराडे, तसेच शिक्षणाधिकारी सुलभा वठारे यांची शिक्षणाधिकारी यांचे स्वागत करणेत आले.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजय पवार,
मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजय पवार, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, गटविकास अधिकारी मनोज राऊत, कार्यकारी अभियंता पंडित भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. सोनाली बगाडे, प्रकल्प संचालक उमेश कुलकर्णी, जि प सदस्य मदन दराडे, माजी सरपंच अजिनाथ देशमुख, मादी सरपंच कविता घोडके, कास्टाईबचे अरूण क्षीरसागर, मराठा सेवा संघाचे अविनाश गोडसे, कर्मचारी महासंघाचे राजेश देशपांडे, अधिक्षक जगताप, राज्य शासकीय कंत्राटी कर्मचारी संघटनेचे अधक्ष सचिन जाधव प्रमुख उपस्थित होते.
या प्रसंगी प्रास्तविक प्रशासन व ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी केले. उप मुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजय पवार,
मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजय पवार, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, गटविकास अधिकारी मनोज राऊत,कार्यकारी अभियंता पंडित भोसले, ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद भुजबळ, कर्मचारी संघटनेचे विवेक लिंगराज यांनी मनोगत व्यक्त केले. केले. विविध कर्मचारी संघटनेचे वतीने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर व प्रकल्प संचालक चंचल पाटील यांचा सत्कार करणेत आला.
सत्कारास कार्यकारी अभियंता खराडे व शिक्षणाधिकारी योजना च्या सुलभा वठारे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
जिल्हा परिषदे मध्ये काम करताना तारेवरची कसरत- सिईओ स्वामी
गेल्या दोन वर्यापासून जिल्हा परिषदे मध्ये काम करीत असताना तीरेवरची कसरत असते मात्र आता तार पण पाचाखाली राहिली नाही. कुटूंब प्रमाणे काम करा. आपण खुप छोटे आहोत. पदाचा गर्व करू नका. असे आवाहन सिईओ दिलीप स्वामी यांनी केले.
कोहिनकर यांचेमुळे सुटकेचा निःश्वास
सिईओ दिलीप स्वामी म्हणाले गेल्या पंधरा दिवसा पासून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कोहिनकर यांचे कामकाज निरिक्षण करत आहे. खुप सकारात्मक व रचनात्मक काम करणेची त्यांची कामांची पध्दत या जिल्हा परिषदेस चांगली दिशा देईल. त्यांचे कामात चांगले सहकार्य राहणार असल्याचे सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले.
चांगले काम करूयात – कोहिनकर
जिल्हा परिषदे मध्ये गेल्या अनेक वर्षा पासून काम करीत असताना पुर्ण क्षमतेने काम केल्याचा आनंद आहे. सोलापूर जिल्हा परिषदे मध्ये सर्वाना विश्वासात घेऊन काम करू अशी ग्वाही त्यांनी दिली.



















