सोलापूर : जिल्हा परिषदेतील शिक्षण विभाग शालेय पोषण आहार विभागाचे लेखाधिकारी डॉक्टर वैभव राऊत यांनी स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षामध्ये त्यामध्ये शासनाने सुरू केलेल्या माझी वसुंधरा अभियानाची मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांची प्रेरणा घेऊन सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी वसुंधरा हरित वसुंधरा, स्वच्छ वसुंधरेचा बारा हजार पाचशे फूट उंचावर पूर्ण बर्फाच्छादित उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील केदारकंठ ट्रेक समेट पूर्ण करून त्या ठिकाणी जिल्हा परिषद सोलापूरचा बॅनर फडकावला व महाराष्ट्रातील तसेच देशातील तमाम जनतेला वसुंधरेचे रक्षण करण्याचा संदेश दिला.
संपूर्ण ट्रेकचे वैशिष्टय म्हणजे या ठिकाणी एकही प्लॅस्टिकचा तुकडा आढळत नाही, कोणाला प्लास्टिक टाकू पण देत नाहीत. सर्व गोष्टीचा वापर हा नैसर्गिक आहे. शुद्ध शाकाहारी आहार, सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले या ठिकाणचे धान्य वापरले जाते त्यामुळे या ठिकाणच्या पहाडी लोकांचे आयुष्यमान खूपच जास्त आहे.
लेखाअधिकारी डॉक्टर वैभव राऊत यांनी सलग पाच दिवस 6 सहा ते 7 तास मध्ये दररोज चार ते पाच किलोमीटर अंतर चढाई करून रात्रभर पूर्ण बर्फामध्ये टेन्टमध्ये आत मुक्काम करून मायनस 17 अंश डिग्री टेंपरेचर वर 12500 बारा हजार पाचशे फूट उंचीवर केदार कंठ ट्रेक पूर्ण केला त्याचे अधिकृत प्रमाणपत्र त्यांना प्राप्त झाले. या प्रवासात साक्री, जुडा का तालाब, केदारकंठ बेस कॅम्प व शेवटी केदारकंठ समेट अशी वेगवेगळ्या ठिकाणी मुक्काम करत प्रतिकूल हवामाना वर मात करत चढाई करावी लागली .
त्यांच्यासोबत योग ट्रे वेंचर माध्यमातून आलेले बारा जणांची वेगवेगळ्या जिल्ह्यातील ट्रॅकरची टीम होती. त्यात नागपूर हैदराबाद केरळ दिल्ली व पुणे येथील ट्रॅकर सहभागी झाले होते
सोलापूर जिल्हा परिषदेचा माझी वसुंधरेचा संदेश पाहून सर्वांनाच खूप आनंद झाला व आपण सर्व जण यात सहभागी होऊन मानव जातीला वसुंधरेचे रक्षण करण्याचा संदेश देत असल्याचा अभिमान वाटला. या सर्व मोहिमेमध्ये त्यांना त्यांची पत्नी जि प सदस्य रेखा राऊत यांचे, तसेच मुख्य वित्त व लेखा अधिकारी अजय पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील , शिक्षणाधिकारी लोहार, उपशिक्षणाधिकारी जावीर, सर्व लेखाधिकारी व जिल्हा आयुष अधिकारी डॉक्टर विलास सरवदे यांचे सहकार्य लाभले.

















