सोलापूर : तत्कालीन प्राथमिक शिक्षण अधिकारी किरण लोहार यांच्या लाच प्रकरणामुळे सोलापूर जिल्हा परिषदेची राज्यभर बदनामी झाली. तसेच माध्यमिक शिक्षण विभागात टप्पा अनुदानाच्या गोंधळामुळे सुद्धा शिक्षण विभाग चर्चेचा झाला.
आता मागील काही महिन्यांपासून संजय जाविर यांनी प्राथमिक शिक्षण विभाग चांगल्या पद्धतीने सांभाळली आहे. कमी कर्मचारी असतानाही कोणत्याही सध्या तक्रारी येताना दिसत नाहीत. एकीकडे असे कामकाज चालू असताना दुसरीकडे मात्र काही लाचखोर कर्मचाऱ्यामुळे शिक्षण विभागाला बदनाम व्हावे लागत असल्याचे चित्र आहे.
बुधवारी जिल्हा परिषद कामगार कर्मचारी संघटनेचे नेते साथी बशीर शेख हे काही व्यक्तींसोबत तावातावाने प्राथमिक शिक्षण विभागात गेले, एका कनिष्ठ सहाय्यक यांना त्यांनी जोरजोरात भांडत होते, एका कागदाला आऊट वर्ड देण्यासाठी तू 500 रुपये मागतो तुला लाज वाटत नाही.
दरम्यान बशीर शेख यांना याप्रकरणी विचारले असता, त्यांनी सांगितले की, शिक्षणाधिकारी जावीर यांनी माझ्या नातवाच्या ऍडमिशनसाठी पत्र घेतले होते, त्यांनी सही करून दिली ते पत्र केवळ आऊट वर्ड करून देण्यासाठी पैसे मागतात हे लोक. अशांवर जावीर यांनी कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली.



















