सोलापूर – आषाढी यात्रे साठी येणारे भाविकांसाठी जिल्हा परिषदेने एकात्मिक वारकरी निवारा केंद्र उभारले आहे. तालुक्यातील गुरसाळे येथे दहा हजार वारकरी यांची निवास व्यवस्था करणेत आली आहे. या केंद्राचा वारकरी यांनी लाभ घ्यावा असे आवाहन सोलापूर जिल्हा परिषदेचे प्रशासक व मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.
आषाढी यात्रा कालावधीत वारकरी यांना शौचालय सुविघा व स्नानगृह व व निवारा साठी खुप संघर्ष करावा लागतो. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे संकल्पनेतून वारकरी यांना चांगल्या सुविघा पालखी मार्गांवर देणे देणेत येत आहेत. ग्राम विकास मंत्री गिरीष महाजन यांनी देखील वारकरी यांना सुविधा देणे साठी सुचना केली होती. त्या नुसार पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथे दहा हजार वारकरी यांची निवास व्यवस्था करणेत आली आहे.
दि. २८ ते ३० जून २०२३ या कालावधीत ही सुविधा उपलब्ध करून देणेत आली आहे. पंढरपूर ला टेभुर्णी व करकंब मार्गे येणारे भाविकांना चांगली सोय झाली आहे. या साठी नोडल अधिकारी म्हणून अक्कलकोट चे गटविकास अधिकारी सचिन खुडे यांची नियुक्ती केली आहे. पंढरपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत काळे हे लक्ष ठेऊन आहेत.
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना परिसरात ही सुविधा देणेत आली आहे. या ठिकाणी सीसीटिव्ही, हिरकणी कोण, कपडे बदलण्याची सुविधा, अग्निशामक, पिणेचे शुध्द पाणी, स्नान करणे साठी स्नानगृह, आरोग्य पथक, मोबाईल चार्जिंग ची सुविघा, तसेच दहा हजार वारकरी यांना पुरेल एवढी शौचालय सुविघा देणेत आली आहे. तीन दिवस या ठिकाणी सुविघा देणेत येत आहेत. पंढरपूर पासून ८ किमी अंतरावर ही सुविधा आहे. गुरसाळे पंढरपूर मार्गांवर ही सुविघा देणेत आली आहे. वाटेवर चंद्रभागा नदी आहे.
या सुविधे साठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप कोहिणकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव हे प्रयत्न करत आहेत.
वारकरी निवारा केंद्राची वैशिष्ट्ये
……………………………..,
✅सीसीटिव्ही,
✅हिरकणी कक्ष
,✅कपडे बदलण्याची सुविधा,
✅अग्निशामक सुविधा
✅ पिण्याचे शुध्द पाणी
✅ महिला व पुरूषांसाठी शौचालय
✅ महिला व पुरूषांसाठी स्नानगृह
✅ सर्व सुविधांनी युक्त आरोग्य पथक,
✅मोबाईल चार्जिंग ची सुविघा,

















