सोलापूर : तत्कालीन जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे हे दीड वर्षापूर्वी सेवानिवृत्त झाले होते. त्यानंतर सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे यांच्याकडे पदभार देण्यात आला होता. आता शासनाने सोलापूर जिल्ह्याला पूर्ण वेळ जिल्हा नियोजन अधिकारी दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन अधिकारी दि. शि. पवार यांची सोलापूर जिल्हा नियोजन अधिकारी पदावर नियुक्ती केली आहे. शुक्रवार 11 ऑगस्ट रोजी शासनाने परिपत्रक काढले.
पुंडलिक गोडसे यांनी मागील दीड वर्षाच्या कार्यकाळात चांगल्या पद्धतीने कामकाज केल्याचे पाहायला मिळाले सर्वच आमदार आणि खासदार यांच्याशी समन्वय ठेवून त्यांनी काम केले आहे.