सोलापूर : ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी जिल्ह्यातील 3 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम माणिकराव गुंजवटे यांचा समावेश आहे. त्यांना नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली असून त्यांच्या जागेवर वाचक शाखेचे निरीक्षक रणजित नारायणराव माने यांना पाठवण्यात आले आहे. तर नामदेव गणपतराव शिंदे यांना नियंत्रण कक्षेतून वाचक शाखेत पाठवण्यात आले आहे. (Rural Superintendent of Police Tejaswi Satpute has transferred 3 police inspectors in the district. Among them is police inspector Jyotiram Manikrao Gunjwate of Mangalwedha police station. He has been transferred to the control room and has been replaced by Reader Branch Inspector Ranjit Narayanrao Mane. Namdev Ganapatrao Shinde has been sent from the control room to the reader branch.)
मंगळवेढ्याचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांच्यावर आमदार समाधान आवताडे यांनी विधी मंडळात अवैध वसुलीचे गंभीर आरोप केले होते, तेव्हापासून ते रडारवर होते तसेच मरवडे बालिका मृत्यू प्रकरणात त्यांनी गुन्हा करण्यास हयगय केली होती, त्याप्रकरणी जनसेवा शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख यांचे आंदोलन सुरू होते. शेवटी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी गुंजवटे यांची बदली केली.
















