सोलापूर : संपूर्ण देशात चर्चेचा विषय असलेल्या कोरोना ओमीक्रोन व्हेरियंटचे अखेर गुरुवारी दोन रुग्ण आढळले, ही माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केली असून या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा प्रशासन अलर्ट झाले आहे. सोलापूर जिल्ह्यात कर्नाटकातुन येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर टेस्ट आणि लसीकरण बंधनकारक करण्यात आल्याची माहिती सहायक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे यांनी दिली तसेच नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात लसीकरण करून घ्यावे असं आवाहन देखील त्यांनी केलं पहा काय म्हणाल्या आव्हाळे…


















