सोलापूर : मोहोळ तालुक्यातील येवती गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत विश्वनाथ भाग्यवंत हे मुख्याध्यापक पदावर काम पाहत होते मात्र शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षांच्या पत्नी प्रशालेत स्वयंपाकी मदतनीस होत्या त्या काम करत नसल्याने मुख्याध्यापक भाग्यवंत यांनी कामावरून काढले त्याचा राग मला करून संबंधित शालेय व्यवस्थापन अध्यक्ष यांनी इतर शिक्षकांना हाताशी धरून मागासवर्गीय मुख्याध्यापकाच्या विरोधात तक्रारी केल्या. प्राथमिक शिक्षण विभागाने याबाबत कोणतीही सविस्तर चौकशी न करता भाग्यवंत यांना निलंबित केले आहे.
अनेक महिन्यांपासून भाग्यवंत हे जिल्हा परिषदेमध्ये फेर्या मारत आहेत मात्र त्यांची कुणीही दखल घेत नाही अशी तक्रार मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे श्यामराव जवंजाळ यांनी केली. प्राथमिक शिक्षण विभाग जाणीवपूर्वक मागासवर्गीयांना त्रास देते, विशिष्ट समाजावरती एवढी मेहेरबानी का? असा सवाल जवंजाळ यांनी उपस्थित करताना मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दखल घेऊन या प्रकरणाची सविस्तर चौकशी करावी अन्यथा आम्हाला आमरण उपोषण केल्याशिवाय पर्याय नाही असा इशारा जवंजाळ यांनी दिला.
















