सोलापूर : जिल्हा परिषदेमधील सर्व संवर्गीय मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्या सोबत मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या दालनात झालेल्या बैठकीत प्रश्नमार्गी लावले जातील असे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी दिले. सीईओ आव्हाळे व उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्या सोबत कास्ट्राईब संघटनेच्या पदाधिकारी यांनी विविध प्रश्नावर चर्चा केली. यामध्ये मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे प्रश्नावर चर्चा करण्यात आली.
कर्मचाऱ्यांच्या अपघात विम्याच्या सेवापुस्तकात नोंदी घेणे, लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांचे गोपनीय अहवाल वेळापत्रकानुसार पुर्नविलाकन करणे व संबधिताना बजावणे ,याबाबत सर्व खाते प्रमुखांना पत्रव्यवहार करून सुचना देण्यात येतील असे आश्वासन देण्यात आले. पेन्शन टक्यामध्ये देणेच्या प्रक्रियेमध्ये सुधारणा करून पुर्ण पेन्शन देण्यात येईल, याबाबत सुधारणा करण्यात येईल. भविष्य निर्वाह निधी मेडीकल बील, पगार बील व पेन्शन प्रकरणे याबाबत ऑनलाईन सुविधा करणेत येईल. तसेच असेही आश्वासन देण्यात आले. अनुकंपा धोरणातील विसंगती बाबत व सर्वसाधरण बदल्यामधील काही बाबी सुधारणेबाबत संघटनेच्या मागणी नुसार शासनाशी पत्रव्यवहार केला जाईल वरिल सर्व महत्वाच्या मागण्या बाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे सोबत सकारात्मक चर्चा झाली. मागण्या मार्गी लावण्याचे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती. मनिषा आव्हाळे यांनी दिले.
यावेळी झालेल्या चर्चेत कास्ट्राईब जि.प कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरूण क्षीरसागर, चंद्रकांत होळकर यांनी सहभाग घेतला तर महासंघाचे जिल्हाध्यक्ष मनिष सुरवसे, सचिव अरविंद जेठीथोर, उमाकांत राजगुरू, नरसिंह गायकवाड, कल्याण श्रावस्ती, भगवान चव्हाण, रमेश गायकवाड, श्रीमती राजश्री कांगरे आदिनी सहभाग नोंदविला तर प्रशासनाच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्र) श्रीमती स्मिता पाटील, अधिक्षक सचिन सांळुखे, महेश केंद्रे, अरविंद सोनवले, मोहित वाघमारे, श्रीमती काटकर, श्रीमती सुतार उपस्थित होते.