जिल्हा परिषद सोलापूर येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची 140 वी जयंती स्वातंत्र्यवीर गौरव दिन म्हणून साजरी करण्यात आली. यावेळी सावरकर आणि भाषाशुद्धी या विषयावर बोलताना ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी यांनी सावरकर यांचे मराठी भाषेवरील प्रेम व त्यांनी मराठी भाषेत मध्ये केलेल्या सुधारणा सांगितल्या. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सावरकर यांचे प्रखर देशभक्तीचे उदाहरणे देऊन सावरकर यांनी लिहिलेले काव्य व पुस्तके वाचली तर प्रखर देशभक्ती काय असते हे समजून येते असे सांगून सावरकरांना अभिवादन केले.
सदर कार्यक्रमास उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशादीन शेळकंदे, जावेद शेख, कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, प्रकल्प संचालक उमेश कुलकर्णी, लेखाधिकारी पाटील व कुंभार यांच्यासह कर्मचारी संघटनेचे विविध पदाधिकारी दिनेश बनसोडे, राजेश देशपांडे अविनाश गोडसे, विवेक लिंगराज, अरुण क्षीरसागर, गिरीश जाधव, लक्ष्मण वंजारी,दत्तात्रय घोडके, संजय देशपांडे, चंद्रकांत होळकर,प्रताप रुपनर, पांडुरंग कविटकर, दयानंद परिचारक, विजय कुलकर्णी, प्रसाद देवळे, लक्ष्मण झिपरे, नितीन जाधव, जहीर शेख व अनेक कर्मचारी उपस्थित होते. आभार प्रदर्शन लेखाधिकारी पाटील यांनी केले.



















