सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने 6 जानेवारी शिवराज्याभिषेक दिन हा राज्यात शिवस्वराज्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानातील शिवरायांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. पुतळा सभोवताली मांडव घालण्यात आला होता.
भगव्या स्वराज्य ध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारून त्याचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाचा प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अतिरीक्त मुख्य कार्यकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशादिन शेळकंदे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तम सुर्वे, कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, माध्यामिक शिक्षणाधिकारी जावेद शेख , प्रकल्प संचालक अमोल जाधव, कृषी अधिकारी परमेश्वर वाघमोडे, गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ, सोलापूर जिल्ह्याचे ब्रँड अँबेसिडर गायक मोहम्मद आयाज, मराठा सेवा संघ कर्मचारी संघटनेचे अविनाश गोडसे, कर्मचारी युनियनचे विवेक लिंगराज, सचिन जाधव यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थिती होते.
छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करताना सीईओ स्वामी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आणि ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय मराठी माणसाने मरता कामा नये असे सांगत ते म्हणाले, या दोन्ही ग्रंथांमध्ये जो ज्ञान आणि आदर्श मिळणार आहे तो आपल्या आयुष्यातील कोणत्याही कार्याला उपयोगी पडणारे आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये प्रजेच्या कल्याणाशिवाय दुसरा कोणताही विचार केलेला नव्हता त्यामुळेच ते या भूतलावर सर्वश्रेष्ठ राजे मानले जातात.
प्रमुख पाहुणे जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे म्हणाले, छत्रपती शिवाजी राजे यांचे कार्य केवळ आपल्यासाठी नव्हे तर संपूर्ण जगासाठी आदर्शवत आहे. छत्रपती शिवाजी राजे यांचा गनिमी काव्याचा आणि युद्धनीतीचा अभ्यास हा आंतरराष्ट्रीय अभ्यासाचा विषय आहे. आपण आज सोशल इंजिनिअरिंगची चर्चा करतो परंतु साडेतीनशे वर्षांपूर्वीच छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरापगड जातींच्या मावळ्याचा संघटन करून मुघलांच्या तावडीतून भारताची आणि महाराष्ट्राचे सुटका केली. हे सोशल इंजिनिअरिंगचे काम ज्यावेळी भारतामध्ये जाती व्यवस्था होती त्यावेळेस त्यांनी आदर्श आपणासमोर ठेवला आहे.























