सोलापूर : मागील वर्ष दोन वर्षात सोलापूर जिल्हा परिषद विविध भ्रष्टाचार, लाच प्रकरणामुळे चांगलीच बदनाम झाली आहे. विशेष म्हणजे शिक्षण विभाग चव्हाट्यावर आला. माध्यमानीं जेव्हा शिक्षण विभागातील काही भ्रष्ट आणि अनेक वर्ष एकाच खुर्चीला चिकटून बसलेल्या कर्मचाऱ्यांच्या बातम्या प्रसिद्ध करताच त्यांच्या बदल्या करण्यात आल्या.
प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार हे लाच प्रकरणात अडकल्यानंतर त्यांच्या जागेवर उपशिक्षणाधिकारी संजय जावीर यांना प्रभार देण्यात आला. याच प्राथमिक शिक्षण विभागात संजय कांबळे हे कर्मचारी कार्यरत होते. मधल्या काळात संजय कांबळे यांची बदली बांधकाम विभागात करण्यात आली होती परंतु कांबळेचे मन बांधकाम करण्याऐवजी शिक्षण विभागात जास्त रमत गमत असल्याचे चित्र अजूनही पाहायला मिळतं.
तसेच एक शिक्षण विभागातील मास्टरमाईंड अधीक्षक यांचीही बदली दक्षिण पंचायत समितीमध्ये झाली होती, त्याठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये काम सोडून कायम वावरणारा कामगार नेता त्या कर्मचाऱ्याला पाठीशी घालतो. त्या कर्मचाऱ्याचेही मन दक्षिण पंचायत समितीमध्ये रमत नाही, तोही शिक्षण विभागात अजूनही लुडबुड करत असल्याची चर्चा आहे. त्याच्या मार्फतच केंद्रप्रमुखाच्या पदोन्नतीमध्ये आर्थिक देवाण-घेवाण झाल्याची चर्चा आता चांगलीच रंगली आहे.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात संजय हे नाव बदनाम होत असताना दिसते. त्याला कारणेही तशीच आहेत. प्राथमिक शिक्षण विभागाच्या विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख या पदोन्नतीमध्ये मोठी आर्थिक देवाणघेवाण झाल्याची कुणकुण जिल्हा परिषदेमध्ये ऐकायला मिळते. यामध्येही संजय हेच नाव आता पुढे येत आहेत.
संजय जावीर यांच्या वडीलानी जिल्हा परिषदेमध्ये शिक्षणाधिकारी म्हणून काम केले आहेत त्यामुळे ते आपल्या जावीर या नावाला धक्का लावू देत नाहीत. परंतु प्राथमिक शिक्षण विभागातील काही भ्रष्ट कर्मचारी आहेत की जे ज्यांच्यामुळे अधिकारी बदनाम होत आहेत.
जिल्हा परिषदेमध्ये पदाधिकारी नसल्याने भ्रष्टाचार आणखीच वाढल्याचे पाहायला मिळतं. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामींनी आपल्या प्रत्येक बैठकांमध्ये प्रत्येकांची कान उघडणी करतात पण या भ्रष्ट कर्मचाऱ्यांना काही फरक पडत नाही हे कर्मचारी निगरगट्ट असल्याचं चित्र झेडपी मध्ये आहे.



















