सोलापूर जिल्हा परिषदेचे सर्व सेवानिवृत्तीधारक यांनी माहे ऑगस्ट 2023 चे निवृत्ती वेतन/ कुटुंब निवृत्ती वेतन 1 सप्टेंबर 2023 रोजी केलेबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांचे त्रिवार अभिनंदन व धन्यवाद समक्ष भेटून केले.
माहे ऑगस्ट 2023 चे दरमहाचे सेवानिवृत्ती वेतन माहे सप्टेंबर 2023 च्या 1 तारखेला झालेने सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात कधीही 1 तारखेला पेन्शन वेतन झालेले नाही. नेहमी 9 ते 10 तारखेला पेमेंट होत होते. आपल्या सेवानिवृत्तीधारकाविषयी असणाऱ्या सहानुभूतीमुळे सेवानिवृत्तीधारक मनोमन सुखावला आहे असे सर्व सेवानिवृत्त कर्मचारी गरड व्ही.आर, पी.एन. शेटे, एस. बागेवाडी व एम.ए. शेख यांनी सांगितले.