सोलापूरच्या सिद्धेश्वर यात्रेला सुमारे 900 वर्षाची परंपरा आहे सिद्धेश्वर यात्रेच्या चार दिवसांपैकी दुसरा दिवस हा अक्षता सोहळ्याचा दिवस , अक्षता सोहळ्याला सोलापूर शहर जिल्ह्यासह गुलबर्गा कर्नाटक राज्य व उस्मानाबाद , लातूर या ठिकाणाहून लाखो भक्त उपस्थिती लावतात यंदा मात्र या यात्रेवर कोरूना संसर्गाचे सावट दिसून आले प्रशासनाने अतिशय कडक निर्बंध घालून या यात्रेला परवानगी दिली होती, अक्षता सोहळ्यासाठी पन्नास मानकरी व पुजाऱ्यांना परवानगी देण्यात आली होती मानाचे सात नंदीध्वज हे वाहनाने थेट हिरेहब्बू वाड्यातून सिद्धेश्वर मंदिरात आणण्याचे नियोजन प्रशासनाने केले होते पोलीस प्रशासनाने सिद्धेश्वर मंदिराच्या परिसरात 12 ते 16 जानेवारी दरम्यान संचारबंदी लावली आहे भाविकांना दर्शनासाठी मंदिर बंद ठेवण्यात आले आहे , बुधवारी अक्षता सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पार्क चौक ज्ञान प्रबोधनी प्रशाला, सिद्धेश्वर शाळा या बाजूनी मोठा बंदोबस्त ठेवला होता बरेकेट्स लावून प्रत्येकांचे पास पाहूनच आत सोडले जात होते, त्यामुळे या मार्गांवर स्मशानशांतता दिसून आली पोलीस वगळता एकही माणूस रस्त्यावर दिसला नाही सकाळी दहा वाजून 40 मिनिटांनी मानकऱ्यासह योगदंड व पालखीचे आगमन झाले नंदीध्वज ची मिरवणूक रद्द करून केवळ पालखी आणि योगदंड संमती कट्ट्यावर आणण्यात आला पालखी आणि योगदंडाचे आगमन झाल्यानंतर सुगडी पूजन व गंगा पूजन करण्यात आले अकरा वाजून दहा मिनिटांनी अक्षता सोहळ्याला सुरुवात झाली, सिद्धेश्वर महाराजांनी कन्नड भाषेतून रचलेल्या मंगलाष्टका शेटे घराण्यातील मानकरी सुहास शेटे यांनी म्हटल्या. शेटे यांनी सत्यम सत्यम दिडम दिडम उच्चारताच उपस्थित भाविकांनी अक्षतांचा वर्षाव केला त्याचवेळी सिद्धेश्वर महाराज की जय असा एकच जयघोष झाला…या सोहळ्याला सर्व सात नंदीध्वजचे मानकरी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामी मानकरी असलेले आमदार विजयकुमार देशमुख, देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, बसवशास्त्री हिरेमठ, डॉक्टर किरण देशमुख एडवोकेट मिलिंद थोबडे , बाळासाहेब भोगडे, माजी आमदार विश्वनाथ चाकोते सिद्धाराम चाकोते, नगरसेवक नागेश भोगडे, यांच्यासह ठराविक मानकरी उपस्थित होते, अक्षदा सोहळ्यावेळी पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर पोलीस उपायुक्त बापूसाहेब बांगर गुन्हे शाखेचे पोलीस सहाय्यक आयुक्त अभय डोंगरे,सहाय्यक आयुक्त प्रीती टिपरे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय साळुंखे फौजदार चावडीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट, सदर बजारचे पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले, पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक पोलिस कर्मचाऱ्यांचा मोठा बंदोबस्त सिद्धेश्वर मंदिर परिसरात होता.
समरसेनजीत प्रमोद गायकवाड व अजित गायकवाड यांचा जामीन अर्ज फेटाळला
समरसेनजीत प्रमोद गायकवाड व अजित गायकवाड यांचा जामीन अर्ज फेटाळला सोलापूर- सिध्दार्थ हौसिंग सोसायटी सोलापूर येथे राहणाऱ्या वैभव वाघे याचा...