सोलापूर : सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रा होणार की नाही याबाबत अजूनही संभ्रमावस्था कायम आहे. मागील काही दिवसापूर्वी एका प्रादेशिक वाहिनीने सोलापूरची सिद्धेश्वर यात्रा रद्द अशी बातमी दिली त्यानंतर संपूर्ण सोलापुरात भाविकांमधून असंतोष पुढे आला मात्र यात्राही रद्द झाली नाही अफवांवर विश्वास ठेवू नये असे प्रशासनाने स्पष्ट केले.
दरम्यान जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे ओमीक्रोन संसर्गाच्या पार्श्वभूमीवर काय निर्णय घेणार याची ही उत्सुकता होती. राज्य सरकारने सोलापूर शहरासाठी महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांना कोरोनाच्या अनुषंगाने निर्णय घेण्याचे स्वतंत्र अधिकार दिले आहेत. म्हणून आयुक्त सिद्धेश्वर यात्रेचा निर्णय घेतील असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते मात्र िल्हाधिकार्यांच्या उपस्थितीत पोलीस प्रशासन व महापालिका प्रशासनाची संयुक्त बैठक पार पडली यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिका आणि पोलिस प्रशासनाकडून स्वतंत्र प्रस्ताव मागवले त्याचा एकत्रित प्रस्ताव सध्या शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.
नेमके प्रस्तावात काय आहे याची उत्सुकता संपूर्ण सोलापूरकरांना असल्याने याची वरिष्ठ स्तरावरून माहिती घेतली असता असे समजले की, ग्रामदैवत सिद्धेश्वरची यात्रा होणार हे निश्चित परंतू होम मैदानात तसेच परिसरात कोणतेही मनोरंजनाचे दुकाने लावली जाणार नाहीत. जानेवारी 2021 मध्ये झालेल्या यात्रे प्रमाणेच ही यात्रा होईल. यात्रेमधील सर्वात महत्त्वाचा धार्मिक विधी असलेल्या अक्षता सोहळ्याला त्यावेळी 50 मानकऱ्यांच्या उपस्थितीत परवानगी देण्यात आली होती यंदा मात्र या संख्येमध्ये वाढ करावी असे प्रशासनाने सुचविण्यात आल्याचे समजते.
मागची यात्राही कोरोच्या संसर्गामुळे सर्व धार्मिक विधी हा योग दंडाला घेऊनच करण्यात आले होते. यात्रा काळात गर्दी होऊ नये म्हणून मंदिर पाच दिवस बंद होते, नंदीध्वज मिरवणूक टाळण्यात आली. सर्व नंदीध्वज त्या-त्या मानकऱ्यांच्या घरी पूजा करून ठेवण्यात आले होते. अक्षता सोहळ्याला 50 मानकरी यांनाच परवानगी होती.
दरम्यान यंदा मानकरी हिरेहब्बू यांच्यावतीने नंदीध्वज मिरवणूक काढण्यास परवानगी द्यावी, एका नंदीध्वजासोबत कोरूनाच्या दोन्ही लसीचे डोस झालेल्या किमान पन्नास मानकरी असावेत अशा पद्धतीने यात्रेला परवानगी द्यावी अशा मागणीचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आल्याचे समजते. दरम्यान मागील तीन दिवसांपासून राज्यामध्ये झपाट्याने वाढत असलेले कोरोना रुग्ण संख्या पाहता आता शासन काय निर्णय घेणार याकडेही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

















