सोलापूर : काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी तडकाफडकी काँग्रेसला सोडून राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधले. काँग्रेसने घराघरात मनामनात हे अभियान राबवले यामध्ये प्रत्येक कार्यक्रमात सुधीर खरटमल यांनी सहभाग घेतला. भाजपवर सडकून टीका केली त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांत नवचैतन्य आले, पण अचानक खरटमल यांनी कोणालाही माहिती न होता सुशीलकुमार शिंदे ऐवजी शरद पवारांना आपला नेता मानले आणि राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. आता खरटमल यांची कमी काहीशी भासत असताना त्यांची कसर काँग्रेसची सोलापुरातील तोफ समजले जाणारे माजी आमदार ज्येष्ठ नेते प्रकाश यलगुलवार यांनी भरून काढली आहे ते आता मैदानात आले आहेत.
सोलापूर शहर कॉंग्रेस पक्षाचे माजी आमदार, माजी महापौर, आजी माजी नगरसेवक, आजी माजी ब्लॉक अध्यक्ष, फ्रंटल सेल पदाधिकाऱ्यांची वार्डनिहाय बैठका व जनजागरण अभियान राबविणे या विषयी महत्वाची बैठक कॉंग्रेस भवन सोलापूर येथे शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या अध्यक्षतेखाली माजी आमदार प्रकाश यलगुलवार, माजी आमदार निर्मला ठोकळ, प्रदेश सरचिटणीस विश्वनाथ चाकोते, जेष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री, यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
गुरुवारपासून आगामी महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात वार्डनिहाय बैठका व जनजागरण अभियानाची सुरुवात पूर्व भागातून होणार आहे.
यावेळी बोलताना माजी आमदार प्रकाश यलगुलवार म्हणाले की, खोटे आश्वासने देऊन सोलापूर महापालिकेत भाजप सत्तेवर आली पण पाच वर्षात साधे पाणी देऊ शकले नाही, स्मार्ट सिटीचा बट्ट्याबोळ, विकासकामे ठप्प, हद्दवाढ भागाकडे दुर्लक्ष, भाजपच्या आमदार खासदारांनी काहीही विकासकामे केली नाही. सुशीलकुमार शिंदे व आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूरसाठी अनेक विकासकामे केली आहेत यामुळे लोकांच्या मनात कॉंग्रेस आहे. जनता भाजपला कंटाळली आहे आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत नाकर्त्या सत्ताधारी भाजपला हटविण्यासाठी कॉंग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांनी वार्डावार्डात जाऊन घरोघरी जाऊन काँग्रेसचे काम पोहोचवा आणि सोलापूर महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा असे आवाहन केले.
याबैठकीस गटनेते चेतन नरोटे, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, मनोज यलगुलवार, प्रदेश चिटणीस अलका राठोड, प्रदेश चिटणीस किसन मेकाले, नरसिंह आसादे, माजी महापौर आरिफ शेख, नगरसेवक शिवा बाटलीवाला, रियाज हुंडेकरी, नरसिंग कोळी, हाजी तौफीक हत्तुरे, विनोद भोसले, स्थापत्य समिती सभापती अनुराधा काटकर, नगरसेविका परवीन इनामदार, फिरदोस पटेल, महिला अध्यक्षा हेमा चिंचोळकर, प्रदेश चिटणीस मनिष गडदे, ब्लॉक अध्यक्ष देविदास गायकवाड, अरुण साठे, युवक कॉंग्रेस अध्यक्ष अंबादास करगुळे, NSUI अध्यक्ष गणेश डोंगरे, देवेंद्र भंडारे, जेम्स जंगम, हारून शेख, दत्तू बंदपट्टे, अनिल पल्ली, मधुकर आठवले, NK क्षीरसागर, सुरेश तोडकरी, उपेंद्र ठाकर, फ्रंटल सेलचे भिमाशंकर टेकाळे, अशोक कलशेट्टी, पशुपती माशाळ, लक्ष्मीनारायण दासरी, सायमन गट्टू, बसवराज म्हेत्रे, हाजीमलंग नदाफ, पवन गायकवाड, तिरुपती परकीपंडला, गणेश साळुंखे, सैफन शेख, योगेश मार्गम, विवेक कन्ना, रफिक इनामदार, अनिल मस्के, श्रीधर काटकर, जाबिर अल्लोळी, रमेश फुले, युवराज जाधव, पांडुरंग चौधरी, नूर अहमद नालवार, संजय गायकवाड, सागर शहा, सुभाष वाघमारे, यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

















