सोलापूर : काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी मंगळवार पासून महापालिका प्रवेशद्वारासमोर उपोषण सुरू केले आहे. सोलापूर शहर व हद्दवाढ भागातील गुंठेवारी व प्राथमिक लेआउट बांधकाम परवाने चालू करण्यासंदर्भात हे उपोषण बाबा मिस्त्री करत आहेत.
मागील अनेक वर्षापासून शहर हद्दवाढ भागातील गुंठेवारी आणि लेआउट पद्धतीने झालेले बांधकामे नियमित करण्याकरिता शासनाकडून आदेश प्राप्त झाले आहेत, शिवाय पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये देखील हद्दवाढ भागातील अनाधिकृत बांधकामे नियमित करण्याच्या संबंधीचा ठरावास मान्यता देण्यात आली असताना देखील, पालिका आयुक्त शासन आणि पालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या आदेशाला केराची टोपली दाखवत आहे वारंवार मागणी करून देखील पालिका आयुक्त हद्दवाढ भागातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यास तयार नाहीत…
शासन आदेशानुसार पालिका आयुक्तांनी हद्दवाढ भागातील बांधकामे नियमित करण्याकरताचे आदेश प्रवाहित करावे असे सांगत त्यांनी आयुक्ताच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली.
बाबा मिस्त्री हे प्रभाग 20 चे नगरसेवक असून त्यांच्या पॅनेलमध्ये चारही नगरसेवक काँग्रेसचे आहेत मात्र मंगळवारच्या उपोषणाला केवळ परविन इनामदार या उपस्थित होत्या इतर 2 नगरसेवक हे मात्र दिसले नाहीत. उलट शिवसेनेचे नगरसेवक राजकुमार हंचाटे यांनी पाठिंबा दिला. काँग्रेस पक्षाचे गटनेते अथवा इतर काँग्रेस पक्षाचे कुणीही दिसले नाहीत हे पक्षाचे दुर्दैव आहे.


















