कोरोना प्रादुर्भाव वाढत चालला असून याकाळात लॉकडाऊनमूळे व्यवसाय बंद आहेत नागरिकांचे रोजगार सुद्धा बुडाले आहेत. नागरिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत अश्या कठीण काळात काँग्रेस कार्यकर्ते युद्धपातळीवर काम करून नागरिकांचे अडचणी दूर करण्याचे काम करत आहेत अन्नधान्य वैद्यकीय मदत करण्याचे प्रयत्न सुरू आहे. अश्या संकटाचा सामना करणाऱ्या अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांचेही रोजगार बंद पडले आहे. त्यामुळे माजी आमदार प्रकाश यलगुलवार व आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर काँग्रेस कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार यांनी काँग्रेस कार्यकर्ते, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, NSUI व कॉंग्रेस कमिटी कर्मचारी असे एकूण 50 गरजु काँग्रेस कार्यकर्त्यांना रोख स्वरूपात मदत केली आहे. नेहमीच कॉंग्रेस पक्ष संघटनेचे काम करणाऱ्या गरजु कार्यकर्त्याला मदत करणे हे आपले कर्तव्यभावना समजून माणुसकीच्या नात्याने ही मदत केल्याचे यलगुलवार यांनी सांगितले आहे. तसेच कोरोना विरोधातील लढा सोपा नसला तरी अशक्य मुळीच नाही नागरिकांनी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी नियम पाळून काळजी घ्यावी असे आवाहन ही यावेळी मनोज यलगुलवार यांनी केले आहे.



















