सोलापूर : कर्नाटक राज्यातील बंगळूरु शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समजाकंटावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
यावेळी ब्रिगेडचे अध्यक्ष फारुख शेख, मराठा महासंघाचे दास शेळके, लिंगायत समन्वय समितीचे विजयकुमार हत्तुरे, मातंग समाजाचे युवराज पवार,सकलेश बाभूळगावकर, राकेश कलशेट्टी, मोहम्मद अली शेख यांची उपस्थिती होती.
आपल्या निवेदनात कर्नाटक राज्यातील बंगळूरु येथे घडलेल्या घटनेला काही राजकीय व्यक्ती, अज्ञानी व्यक्ती अभ्यास नसतांना या विषयाचा विपर्यास करीत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वधर्मीय, बहुजनसमाजवादी विचाराचे असतांना आपल्या सर्व समाजाचे बांधव भारतीय आहेत याचा बोध घ्यावा. कोणी समाजात कोणत्याही समाजाविषयी अपशब्द वापरत असेल तर शासन, प्रशासनानी त्यांचेवर योग्य ती कायदेशीर कडक कारवाई करावी अशी मागणी केली. दरम्यान शेळके व हत्तुरे यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री मूर्ख असल्याचा आरोप करत,मोदी यांनी सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लावा अशी मागणी केली….


















