सोलापूर : महापालिका निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतशी राजकीय रंगत वाढत चालल्याचे चित्र आहे. नुकतेच एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर खासदार असदुद्दीन ओवेसी यांचा सोलापूर दौरा झाला या कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले.
शहराचे अध्यक्ष फारूक शाब्दि यांनी मेळावा आयोजित करून सोलापुरातील राजकीय ताकद दाखवून दिली, पोलीस प्रशासनाने हुतात्मा स्मृती मंदिर मध्ये मेळाव्याला परवानगी दिल्याने नागरिकांची गर्दी कमी दिसली मात्र सोलापूरकरांना जो संदेश द्यायचा होता तो ओवेसी आणि शाब्दी यांनी दिला. कमी वेळात हा मेळावा यशस्वी केल्याने फारुख शाब्दी यांचे कौतुक झाले मात्र शाब्दी शेठ हे मेळाल्यानंतर मुंबईला गेले, मुंबईहून परतल्यावर त्यांनी मेळावा यशस्वी केलेल्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसाठी जंगी पार्टीचे आयोजन केले होते, ही पार्टी तळे हिप्परगा भागात झाली.
शाब्दी यांनी पार्टी आयोजित केल्याने पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही, या ठिकाणी कार्यकर्त्यांनी ‘बिर्याणी’ ताव तर मारलाच मात्र आनंदोत्सव साजरा करताना बेधुंद होऊन डॉल्बीवर मनसोक्त डान्स सुद्धा केला. स्वतः शाब्दी यांनी ‘ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट’ या गाण्यावर ठेका धरला. नगरसेवक गाजी जहागीरदार यांनीही जोरदार नृत्य केले त्याचबरोबर युवक अध्यक्ष मोहसिन मैंदर्गिकर यांनीही चांगलाच ठेका धरल्याचे पाहायला मिळाले या ठिकाणी झालेल्या पार्टीचे व्हिडिओ कार्यकर्त्यांनी आपल्या स्टेटस वर ठेवले आहेत पहा हे डान्स केलेले व्हिडिओ…..


















