सोलापूर : सोलापूर शहरात सोमवारपासून पुढील आठ दिवस वाहतूक पोलिसांच्या वतीने कारवाई मोहीम हाती घेण्यात आली आहे. वाहतुकीच्या नियमांचे भंग करणाऱ्या वाहनधारकावर होणार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामध्ये ट्रिपल सीट वाहन चालवणे, विना लायसन्स प्रवास करणे, यासह नियम तोडणार्या वाहन चालकांवर कारवाई होणार आहे. दरम्यान वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त दीपक आर्वे यांनी पोलीस आयुक्त हरीश बैजल यांना पत्र पाठवले असून शहरातील सात पोलीस ठाणे अंतर्गत सात ठिकाणी कारवाई पॉईंट लावण्यात येणार आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्यातून 1 पोलीस अधिकारी आणि 5 अंमलदार अशी मागणी आर्वे यांनी केली आहे.
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...


















