सोलापूर : जिल्हा परिषद महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करमाळयाचे आमदार, माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजयमामा शिंदे हे सोमवारी सोलापूर जिल्हा परिषदेत आले होते, बऱ्याच दिवसांनी त्यांनी पत्रकारांशी विविध विषयांवर गप्पा मारल्या.
राज्यातील तीन पक्षाच्या महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल आणि 2024 सालची निवडणूक सुद्धा एकत्रित येऊनच तिन्ही पक्ष लढतील असा विश्वास आमदार संजयमामानी व्यक्त केला.
याचवेळी, आगामी झेडपी व महापालिका निवडणूक महाविकास आघाडीने एकत्र का लढवू नये असा प्रश्न केला असता त्या त्या जिल्ह्याच्या राजकीय परिस्थितीवरून निवडणुका लढवल्या जाव्यात. निकाला नंतर चित्र पाहून एकत्रित यायचे का ते ठरवता येईल.
मामा तुम्ही, जिल्हा परिषद अध्यक्ष असतानाची स्थिती आणि आताच्या जिल्हा परिषदेच्या स्थितीवर विचारले असता त्यांनी बोलणे टाळले, पत्रकार पुरस्काराचा विषय निघाला होता तेव्हा लेखा व वित्त अधिकारी पवार हे आले असता त्यांना विजयराज डोंगरे यांच्याकडे अर्थ व बांधकाम हेच सभापतीपद आहे का? असा मजेदार प्रश्न केला.
त्याचवेळी पत्रकारांनी असे का? मामा म्हटले असता नाही त्यांचं खातं मधल्या काळात बदललं काय असं वाटलं म्हणून विचारलं असे म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.
उजनी धरण परिसरात पर्यटन केंद्र करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहेत त्याला मंजुरीही मिळाली आहे ते कशा पद्धतीने करायचे त्यांचा कृती आराखडा तयार सुरू करण्याचे काम सुरू आहे. जिल्हा नियोजन समितीमधून निधी मंजुरी मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

















