“महापालिका निवडणुकीत या वेळेस चार नव्हे तर तीन नगरसेवक असतील हे लक्षात ठेवा. ताई माई अक्का, विचार करा पक्का ,”हाता”वर मारा शिक्का ! हे जुने विसरू नका, असे सांगत लोक पाच वर्षातून एकदाच येऊन आपली दिशाभूल करतील. कामाच्या नव्हे तर जातीच्या आधारावर मते मागतील, त्यांना धडा शिकवा, असे आवाहनही आमदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी बोलताना केले”
सोलापूर : प्रभागाच्या विकास कामात अग्रेसर असलेल्या फिरदोस पटेल सोलापूर महानगरपालिकेच्या “टॉप थ्री” नगरसेवकांपैकी एक नगरसेवक असतील, असे सांगत नगरसेविका फिरदोस पटेल यंदा विकास कामांच्या जोरावरच हॅटट्रिक करतील असा ठाम विश्वास आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला.
प्रभाग क्रमांक १६ मधील कॅम्प प्रशाला ते गांधीनगर पर्यंत रस्त्याच्या बाजूला ३५० मीटर लांबीचा मॉडेल रस्ता तयार करून तो “स्मार्ट वॉकिंग ट्रॅक “सह सुसज्ज करण्याच्या कामासह फलटण मस्जिद ते तस्वीर फोटो स्टुडिओ ₹पर्यंत डांबरी रोड करणे, विविध ठिकाणी एलईडी लाईट बसविणे, आकर्षक बाकडे बसविणे ,रंगरंगोटी तसेच झाडे लावणे अशा सुमारे ५० लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन सोमवारी सायंकाळी आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी त्या बोलत होत्या.
याप्रसंगी नगरसेविका फिरदोस पटेल, शशिकांत कलबुर्गी सर, सोहेल शेख, किशोर भोसले, मुंढे सर, शौकत पठाण, सोहेल पठाण आदी उपस्थित होते.
महापालिकेच्या नगरसेवकांपैकी फिरदोस पटेल या टॉप थ्री नगरसेविका असतील ज्या खूप चांगलं काम करत आहेत. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांना मिळणारा सपोर्ट चांगला आहे. हेच यावरून सिद्ध होते,की तुमचं काम हे खूप चांगल्या पद्धतीत तुम्ही करत आहात. ५० लाखाच्या विविध विकास कामांमुळे प्रभाग क्रमांक १६ चा चेहरामोहरा पूर्णपणे बदलून जाणार आहे. सोलापुरात सध्या जी काही कामे सुरू आहेत ,ती केवळ काँग्रेस पक्षाच्या माध्यमातूनच सुरू आहेत, हे कोणालाही नाकारून चालणार नाही.
आपण मला तीनवेळा आमदार म्हणून निवडून आणलं. मी किंवा शिंदे साहेबांनी जात-पात, समाज कधीच वापरला नाही. पण केवळ कामाच्या आधारावर तुम्ही काँग्रेसला आणि आम्हाला साथ देतात. तुम्ही किती हुशार आहेत हे दिसून येते. यावेळेस वेळेससुद्धा काँग्रेसला विसरू नका. काँग्रेस उमेदवार दिसला की मार शिक्का हेच लक्षात ठेवा. नगरसेविका फिरदोस पटेल तिसऱ्यांदा निवडून येऊन हॅटट्रिक करतील यात तिळमात्र शंका नाही. त्यांनी अशीच कामाची पद्धत सुरू ठेवावी अशी देवाचरणी प्रार्थना करते. आम्ही शेवटपर्यंत तुमचं काम करत राहू ,कधी कमी पडणार नाही, सदैव काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून तुमच्या सोबत आहोत , असेही आमदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले.
याप्रसंगी मौलाली शेख, अखलाक शेख ,मुन्ना वळसंगकर, सादिक शेख, खान चाचा ,आरेफा शेख, फरहीन चौधरी, शेख बेनझीर, मोहम्मद सादिक, नाजनीन कोरबु ,शहनाज सय्यद, मनीषा उडाणशिव ,रजिया जमादार, आशा सदाफुले ,नाझेरा पठाण ,मुमताज गौर, स्वाती आवारे, उषा कसबे, हमिदा पठाण यांचीही उपस्थिती होती .
कॅम्प प्रशाला ते गांधीनगरपर्यंत मोठा रस्ता आहे .या रस्त्याची लांबी ३५० मीटर असून या रस्त्यावर एका बाजूला ८ फूट रुंदीचा वॉकिंग ट्रॅक करण्यात येणार आहे. यावरून दररोज या परिसरातील नागरिक वॉकिंग करू शकणार आहेत .तसेच ट्रॅकला सुरक्षेच्या दृष्टीने रीलींग करण्यात येणार आहे .तसेच दोन्ही बाजूला विविध पानाफुलांची सुशोभित झाडे लावण्यात येणार असून ठीकठिकाणी आकर्षक लाइट्स बसविण्यात येणार आहेत. तसेच ज्येष्ठ मंडळींसह फिरायला येणाऱ्या नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था म्हणून आकर्षक बाकडेसुद्धा बसविण्यात येणार आहेत. सोलापूर शहरातील प्रभागातील हा “पहिलाच पायलट प्रोजेक्ट “असेल असा दावा नगरसेविका फिरदोस पटेल यांनी केला आहे.
———————————

















