सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांची सोलापुर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्ता मामा भरणे यांच्या माध्यमातुन गटनेते आनंद चंदनशिवे यांनी भेट घेतली. यावेळी गटनेते आनंद चंदनशिवे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गटनेते किसन जाधव, नगरसेवक गणेश पुजारी,भीमा मस्के, सौरभ पाताळे आदी उपस्थित होते.
सोलापुर शहरातील विविध विकास कामाबद्दल व समश्या संदर्भात गटनेते आनंद चंदनशिवे यांनी शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी विविध विषयावर चर्चा केली. आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. बहुजन समाज पार्टीतून ‘वंचित’ झालेले नगरसेवक आनंद चंदनशिवे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर आहेत पालकमंत्री भरणे मामा यांच्याशी सलगी झाल्याने चंदनशिवे यांचे सध्या कामकाज मस्त चाललंय.
कोणत्याही निधीची कमतरता पडत नाही, यापूर्वी चंदनशिवे यांनी भरणेमामा यांच्या सोबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भेटी घेतल्या आहेत मात्र त्यांनी आजपर्यंत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची एकदाही भेट घेतली नव्हती. शेवटी ती भेट पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्फत घडून आली केवळ शरद पवार साहेबच भेटले नाहीत तर खासदार सुप्रियाताई सुद्धा चंदनशिवे यांना भेटल्या.
नुकताच पत्रकार दिनाचे औचित्य साधून चंदनशिवे यांनी पत्रकार यांचा सत्कार घडवून आणला त्या वेळी इंदापूर बारामती पुण्याच्या फेऱ्या वाढण्यामागील त्यांनी आपला उद्देश सुद्धा स्पष्ट केला, लवकरच माध्यमांसमोर माझी भूमिका स्पष्ट करेल असेही त्यांनी सांगितले.

















