सोलापूर : महापालिकेचे गटनेते आनंद चंदनशिवे यांच्या मातोश्री फुलाबाई चंदनशिवे याचे गुरुवारी निधन झाले. पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर होते. त्यांनी सिद्धेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले त्यानंतर त्यांचा ताफा थेट आनंद चंदनशिवे यांच्या बुधवार पेठ मिलिंद नगर येथील निवासस्थानी गेला.
त्याठिकाणी भरणे मामानी फुलाबाई चंदनशिवे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली तसेच चंदनशिवे कुटुंबीयांचे सांत्वन केले यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार, युवक अध्यक्ष जुबेर बागवान, नगरसेवक तौफिक शेख, गटनेते किसन जाधव,नगरसेवक नागेश गायकवाड यांची उपस्थिती होती.

















