सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर मधील वाणिज्य व व्यवस्थापन संकुल आणि अन्नपुर्णा फाऊंडेशन संचलित जय हिंद फुड बँक यांच्यात काल सामंजस्याचा करार झाला.
लाखो विद्यार्थी या विद्यापीठ मधुन घडत आहेत, शिक्षण, साहित्य, कला, क्रिडा, व इतर वेगवेगळ्या क्षेत्रात सोलापुर चे नाव लौकिक करण्यात आला आहे,आज सामाजिक विभाग फक्त पुस्तका पुरत मर्यादित न राहता हे कार्य प्रत्यक्षपणे चालणार विद्यापीठाच्या शिकवणीतुन इथुन पुढे सामाजिक क्षेत्रात युवकांच्या हातुन राष्ट्र बांधणीच कार्य घडणार.
विशेषतः सामाजिक क्षेत्रात विषेश योगदान देणाऱ्या अन्नपुर्णा फाउंडेशन संचलित जयहिंद फूडबँके सोबत करार करण्यात आला,
सामाजिक कार्या अंतर्गत CSR अभियान राबवणे, विशिष्ट घटक गरजुं पर्यंत पोहचवणे, जनजागृती करणे, विद्यापीठात होणार्या सामाजिक कार्यात सहभागी होणे, विद्यार्थ्यांना सामाजिक सामावुन घेणे, व इतर बाबींचा समावेश करून कुलगुरू डाॅ. मृणालीनी फडणवीस व CA श्रेणीक शहा जयहिंद फुडबँकेचे संस्थापक सतिश सुरेश तमशेट्टी व विश्वस्त अनिकेत सरवदे यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला.
सोलापुर येथून 2013 ला जयहिंद फुडबँकेची “भुक मुक्त भारत” करण्यासाठी संस्थापक सतिश सुरेश तमशेट्टी यांच्या संकल्पनेतून कार्याची सुरूवात झाली,
अन्नवाया न घालवता ते गरजूं पर्यंत पोहचवण्यात यावे यासाठी हे कार्य चालू आहे महाराष्ट्र , गुजरात , छत्तीसगड या राज्यतील 25 वेगळ्या शहरात हे कार्य चालू आहे, आज पर्यंत 40 लाख गरजू लोकांना एक वेळ चे जेवण पुरवण्यात आला.
महापुर, कोव्हिड काळात विषेश योगदान देऊन मा. जिल्हाधिकारी यांच्या कडून या संस्थेचे गौरव ही करण्यात आला, अनेक विविध उपक्रमातुन राष्ट्र बांधणीचे विधेयक कार्य चालू आहे.
अन्न,पाणी,शिक्षण,महिला सबलीकरण,खेळ या महत्वाच्या घटकांतून हे कार्यक्रमात चालू आहेत.
सोलापूरचे नाव आज अन्नपुर्णा फाउंडेशन संचलित जयहिंद फुडबँक च्या माध्यमातुन अनेक राज्यात पोहचवण्यात आले.


















