सोलापूर (प्रशांत कटारे) : सोलापूर महापालिकेचे विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांनी आपल्या निवासस्थानी दिवाळीच्या फराळाचे आयोजन केले होते. शिवसेनेचे विरोधी पक्षनेते अमोल बापूंच्या फराळाला सर्व पक्षीय नेत्यांनी हजेरी लावली. राष्ट्रवादी काँग्रेस कडून जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे, प्रदेश उपाध्यक्ष विद्या लोलगे, शहर अध्यक्ष भारत जाधव, माजी महापौर महेश कोठे, ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल, यु एन बेरिया, दिलीप कोल्हे, नगरसेवक प्रथमेश कोठे जुबेर बागवान, प्रशांत बाबर, बालाजी पवार, आनंद मुस्तारे, महेश निकम्बे ही प्रमुख नेतेमंडळी उपस्थित होती.
शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, शहर प्रमुख गुरुशांत धूत्तरगावकर यांची उपस्थिती होती. काँग्रेस कडून गटनेते चेतन नरोटे, संजय शिंदे सागर शहा यांनी हजेरी लावली. भाजप तर्फे सभागृह नेते शिवानंद पाटील, नगरसेवक संजय कोळी हे उपस्थित होते. माध्यम क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती. मनोहर सपाटे यांची मात्र कमतरता जाणवली,
बापूंच्या कार्यालयात कोठे, खरटमल, लोलगे, नरोटे, काका साठे, जुबेर बागवान एकत्र होते, या सर्वात काँग्रेसचे नरोटे एकटे होते, नरोटे हे महेश कोठे यांच्या कानात बोलत असताना माध्यम प्रतिनिधीनी फोटो काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा नरोटे चिडून फोटो काढू नका नुसती चर्चा करत आहोत असे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावर एकटेपणा स्पष्ट दिसला, यावेळी आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी काय काय प्रयत्न करावे लागतील यांची चर्चा करत असताना काँग्रेसचे चेतन नरोटे यांनी आपण महाविकास आघाडी एकत्र आल्यास भाजपचा पराभव करू शकतो असे सांगितले तेव्हा कोठे यांनी पण होकार देत अजूनही सोलापूरात भाजपच नंबर वन आहे, म्हणूनच आपण एकत्र यायला हवे असे सांगितले. याचवेळी सुधीर बॉस यांनी पुन्हा आपली आमदारांच्या वरची नाराजी बोलून दाखवली,
मागच्या निवडणुकीत आपण एकत्र लढण्याचे नियोजन केले मात्र तुमच्या ताईंनी आघाडी तोडली, आता तरी सांगा आघाडीत यायला असे म्हणून नरोटे यांच्याकडे निशाना केला. यानंतर विधान परिषद निवडणूक होणे शक्य नसल्याचे कोठे म्हणाले, त्यावर नरोटे यांनी सर्वांनी देव पाण्यात घातले आहेत अण्णा…,असे म्हणतात एकच हशा पिकला.
12 डिसेंबर हा शरद पवार यांचा वाढदिवस. त्यादिवशी साहेबांच्या सत्काराचा कार्यक्रम सोलापूरात ठेवायचा का? असे लोलगे म्हणाल्या, कोठे यांनी त्यादिवशी साहेब येणे शक्य वाटत नाही असे सांगितले. याच वेळी सेनेचे पुरुषोत्तम बरडे व गुरुशांत धुत्तरगावकर यांचे आगमन झाले, त्यामुळे एकटे पडलेल्या नरोटे यांच्या चेहऱ्यावर काहीसा ‘आनंद’ दिसला. बरडे आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने जास्त चर्चा न करता बाहेर पडणे पसंद केले.
नंतर बरडे यांनी जुबेर बागवान यांची खेचली ते म्हणाले, जेवण व नाश्त्याला सर्व मिळून बाहेर पडता का?काका तर वडाळ्यावरून येतात असे म्हणतात बागवान यांनी साहेब म्हणूनच पक्ष मोठा दिसतो असे उत्तर दिले. दिलीप भाऊ कोल्हे यांचे उशिरा आगमन झाले, भाऊ नंतर भाजपच्या शिवानंद पाटील यांच्यासोबत नाश्त्याला बसले. या कार्यक्रमात भाजपचे सुद्धा अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये येणार असल्याची चर्चा ऐकण्यास मिळाली.


















