सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या स्वच्छ व सुंदर शाळा उपक्रमातील पुरस्कार विजेत्या शाळांचा सन्मान सोहळा ऑनलाईन पद्धतीने करण्यात आला. मुंबईतून उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची उपस्थिती होती पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर अजितदादा यांनी आपल्या भाषणामध्ये दिवंगत नेते आर आर आबा यांची आठवण काढली.
ज्यावेळी आबा हे राज्याचे ग्रामविकास मंत्री होते त्यावेळी त्यांनी राज्यात निर्मलग्राम ही योजना राबविली, या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील अनेक गावे हागणदारीमुक्त झाली. तोच उपक्रम नंतर केंद्र सरकार स्वच्छ भारत या नावाने राबवत आहे. असे सांगतानाच सोलापूर जिल्ह्यात मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सुद्धा स्वच्छ व सुंदर शाळा या नाविन्यपूर्ण उपक्रमातून त्यांनी जिल्हा व राज्याचा अभिमान वाढवणारे काम केले या शब्दात स्वामी यांचा गौरव केला. दादांनी आबांची आठवण काढली पहा तो व्हिडिओ

















