सोलापूर : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा वार्षिक योजना सन २०२२-२३ प्रारूप आराखडा अंतिम करणेबाबत राज्यस्तर बैठकीस मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह जिल्ह्यातील आमदार उपस्थित होते. बैठकीनंतर आमदार प्रणिती शिंदे यांनी माहिती राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे सोलापूर शहरातील पोलीस वसाहतींमध्ये आमदार निधीतून खर्च करण्यास मान्यता द्या यासह घोषित मात्र खासगी झोपडपट्ट्यांमध्ये रमाई आवास योजना लागू करा अशी मागणी केली होती, ती परवानगी दिल्याने प्रणिती शिंदे यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसून आले पहा काय म्हणाल्या आमदार प्रणिती शिंदे……

















